आकोटात नगर परिषदेच्या एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:22+5:302015-02-14T23:51:22+5:30
आकोट: नगर परिषदेने बसस्थानक मार्गावर उभारलेल्या नवीन एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण ११ फेब्रुवारीला सुरेखा सुधाकर गणगणे यांच्या हस्ते करण्यात आले.

आकोटात नगर परिषदेच्या एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण
आ ोट: नगर परिषदेने बसस्थानक मार्गावर उभारलेल्या नवीन एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण ११ फेब्रुवारीला सुरेखा सुधाकर गणगणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनीता चंडालिया, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिदायत पटेल, कृउबासचे सभापती रमेश हिंगणकर, मो.बद्रुजमा, माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया, बांधकाम सभापती रितेश अग्रवाल, माजी उपाध्यक्ष अफजलखाँ आसीफ खाँ, नगरसेवक हादिक खाँ भुरेखाँ, मंगेश चिखले, नरेंद्र धुर्वे, अफजलखाँ अमरुल्लाखाँ यांच्यासह दिलीप बोचे, सतीश हाडोळे, हफिजखाँ, कदीर ठेकेदार, जितू चंडालिया, गुड्डू चंडालिया, श्यामसुंदर भगत, मुरली रामनानी, खालीदजमा आदी उपस्थित होते. नगर परिषदेने शिवाजी चौक ते जिजामाता चौकापर्यंत असलेल्या बसस्थानक मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पोच रस्ता आदी कामे पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बस स्थानक मार्गावर उंच असे ३० एलईडी पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वितेकरिता वरिष्ठ आरोग्य निरीक्षक गजानन महल्ले, आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया, पाणीपुरवठा अभियंता सचिन चावके, विद्युत विभागाचे विलास गणोरकार, मोहन नाथे आदींसह न.प.कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)फोटो : १३एकेटीपी०९.जेपीजी..............