शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मजुराने 2.5 लाखांचं कर्ज घेऊन बायकोला नर्स केलं; नवऱ्याला सोडून 'ती' प्रियकरासह पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 10:53 IST

नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर पत्नीने आपल्या मजूर पतीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी प्रिया कुमारी प्रियकरासोबत पळून गेली.

झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात 'पती-पत्नी और वो' अशी एक विचित्र घटना समोर आली आहे. मजूर पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबाचे भवितव्य चांगले व्हावे, यासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज घेऊन त्याची पत्नी प्रिया कुमारीला नर्सचं शिक्षण दिलं. नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर याच पत्नीने आपल्या मजूर पतीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी प्रिया कुमारी प्रियकरासोबत पळून गेली. तसेच दिल्लीतील एका मंदिरात प्रियकरासोबत लग्न केलं. 

लग्नाचे फोटो प्रियाने पती टिंकू यादवला विविध लोकांमार्फत पाठवले. प्रिया कुमारीचा प्रियकर दिलखुश राऊतसोबतचा लग्नाचा फोटो पाहून पती टिंकू कुमार यादवच्या पायाखालची जमीनच सरकली. टिंकूने पत्नीच्या नर्सिंगच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्याच पत्नीने त्याची फसवणूक करून प्रियकरासोबत पळून जाऊन मंदिरात लग्न केलं.

या संपूर्ण प्रकरणाबाबत पती टिंकू कुमार यादवने सांगितलं की, 19 सप्टेंबर रोजी पत्नी घरातून बेपत्ता होती. काही अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने त्याने गोड्डा जिल्ह्यातील शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान असं आढळून आलं की त्याची पत्नी प्रिया कुमारी दिलखुश राऊत नावाच्या तरुणासोबत फरार झाली होती. दोघेही पळून दिल्लीत पोहोचल्याचं टिंकूला समजलं. तिथल्या कुठल्यातरी मंदिरात दोघांनी लग्न केलं. लग्नाचे फोटो सोशल मीडिया तसेच इतर माध्यमातून टिंकूपर्यंत पोहोचले. 

टिंकू यादव याने पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. याशिवाय संतप्त झालेल्या पतीने फसवणूक करणाऱ्या पत्नीकडे शिक्षणावर खर्च केलेले लाखो रुपये परत करण्याची मागणी केली आहे. 2020 मध्ये टिंकूने प्रिया कुमारीसोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर प्रियाने पुढे शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. कुटुंबाचे तसेच पत्नीचे उज्ज्वल भविष्य डोळ्यासमोर ठेवून टिंकूने कर्ज काढून पत्नीला गोड्डा जिल्ह्यातील शकुंतला नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न