अखिलेश मोदींकडून काही तरी शिक - मुलायमसिंह यादव

By Admin | Updated: October 24, 2016 12:32 IST2016-10-24T12:32:35+5:302016-10-24T12:32:35+5:30

सत्ता संघर्षावर बोलताना पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदहारण दिले.

Learning from Akhilesh Modi: Mulayam Singh Yadav | अखिलेश मोदींकडून काही तरी शिक - मुलायमसिंह यादव

अखिलेश मोदींकडून काही तरी शिक - मुलायमसिंह यादव

ऑनलाइन लोकमत 
लखनऊ, दि. २४ - समाजवादी पक्षामध्ये सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर बोलताना पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदहारण दिले. त्यांनी आपल्या मुलाला अखिलेशला मोदींकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिला. 
 
पंतप्रधान मोदी गरीब कुटुंबातून आले. त्यांनी संघर्ष केला आणि पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले. पंतप्रधानपदावर असताना ज्या समर्पण भावनेने मोदी काम करत आहेत त्यातून काही तरी शिका असे मुलायमसिंह यादव यांनी सांगितले. 
 
त्याचवेळी मुलायमसिंह यादव यांनी अमरसिंह आणि शिवपाल यादव दोघांनाही आपण सोडणार नसल्याचे अखिलेश यांना स्पष्ट केले. अमरसिंह माझा भाऊ आहे. त्यांना यापूर्वीच्या सर्व पापांसाठी मी माफ केले आहे. अमरसिंहाची साथ सोडू शकत नाही त्यांने आम्हाला वाचवले आहे असे मुलायमसिंह यांनी सांगितले. 
 

Web Title: Learning from Akhilesh Modi: Mulayam Singh Yadav