शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'बाबा का ढाबा' वादातून 'या' 4 गोष्टी शिका, कलेक्टर साहेबांनी दिला ट्विटरवरुन धडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:59 IST

बाबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते म्हणत आहेत, की ‘गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही कधी त्याला चोर म्हटले आहे.

ठळक मुद्देबाबांच्या या माफीच्या व्हिडिओनंतर गौरवनेही ऑल इज वेल म्हणत या व्हिडिओवर कमेंट दिली आहे. त्यामुळे, बाबा आणि गौरव वासन यांच्यातील वाद आता संपुष्टात आला आहे, असेच म्हणावे लागेल.

नवी दिल्ली - गेल्या वर्षी 'बाबा का ढाबा' चागंलाच चर्चेचा विषय होता. आता पुन्हा तो चर्चेत आला आहे. 'बाबा का ढाबा' चलवणारे कांता प्रसाद आता पुन्हा आपल्या जुन्याच ढाब्यावर परतले आहेत. आता त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते यूट्यूबर गौरव वासनला माफी मागत आहेत. गेल्या वर्षी गौरवच्या व्हिडिओनंतरच 'बाबा का ढाबा' चर्चेत आला होता. 

बाबांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ते म्हणत आहेत, की ‘गौरव वासन… तो मुलगा काही चोर नव्हता, ना आम्ही कधी त्याला चोर म्हटले आहे. आमच्याकडून एक चूक झाली आहे, यासाठी आम्ही क्षमा मागतो आणि जनतेला म्हणत आहोत, की जर काही चूक असेल तर आम्हाला माफ करा.’ बाबांच्या या माफीच्या व्हिडिओनंतर गौरवनेही ऑल इज वेल म्हणत या व्हिडिओवर कमेंट दिली आहे. त्यामुळे, बाबा आणि गौरव वासन यांच्यातील वाद आता संपुष्टात आला आहे, असेच म्हणावे लागेल. मात्र, या दोघांच्या वादातून समाजाला अनेक धडे मिळाले आहेत. प्रत्येकजण आपल्या बुद्धीच्या कुवतेनुसार हे धडे घेत असतो.  बाबा का ढाबा आणि ब्लॉगर गौरव यांच्या वादातून आपण खूप काही शिकलो, असे एका सनदी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. अवनीश शरण असं या अधिकाऱ्याचं नाव असून त्यांनी ट्टिवरवरुन याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. बाबा का ढाबा या वादातून आपल्याला काय शिकायला मिळालं, असे म्हणत आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी 4 मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यातून, या 4 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, असं ते म्हणाले. 

1. तात्काळ झालेली प्रगती स्थीरस्थावर राहत नाही. 2. ज्यांनी कठीण काळात आपल्याला साथ दिली, त्यांना दु:खी करू नका. 3. एखाद्यासोबत संबंध बिघडल्यानंतरही, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता असते. 4. समोरच्या व्यक्तीची चूक माफ केल्यास आपले महत्त्व अधिक वाढते, ना की कमी होते.  

टॅग्स :delhiदिल्लीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या