साखळी सामन्यात कोल्हापूर विरुद्ध म
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
ुंबई सबमध्ये चुरस

साखळी सामन्यात कोल्हापूर विरुद्ध म
ु बई सबमध्ये चुरस* कुरूंदवाड अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धाकुरूंदवाड : येथील तबक उद्यान व साने गुरुजी हायस्कूल मैदानात सुरू असलेल्या ४६ व्या महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धेत सायंकाळी सात वाजता साखळी सामने संपले. यामध्ये मुंबई सब विरुद्ध कोल्हापूर, ठाणे विरुद्ध जालना, पुणे विरुद्ध मुंबई सिटी, लातूर विरुद्ध गोंदिया, सांगली विरुद्ध यवतमाळ, रायगड विरुद्ध जळगाव, मंुबई विरुद्ध अकोला यांच्यामध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली.दिवस-रात्र सुरू असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून ३६ पुरुष संघ, तर ३१ महिला संघ दाखल झाले आहेत. आजच्या तिसर्या दिवशी सायंकाळी साखळी सामने संपले असून रात्रीच्या सामान्यापासून बांदफेरीला सुरुवात झाली. दिवसभरात २६ साखळी सामने झाले. त्यामध्ये कोल्हापूर विरुद्ध मुंबई सब यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. दोन्ही संघाकडून गुणांचा पाठलाग केला जात असल्याने तीन सेटमध्ये झालेल्या लढतीत कधी कोल्हापूर, तर कधी मुंबई सब संघाचे पारडे जड होत होते. कोल्हापूरच्या शहनवाज मोमीन, सागर डोंगरे, महेश बांगर, सर्जेराव तांबडे या खेळाडूंनी अप्रतिम खेळी केली. मात्र, मुंबई सबच्या के. पटेल, जी. भडंगे यांच्या बॅकिंग व स्मशिंगपुढे २५-२२, २३-२५, १५-११ अशा गुणांनी कोल्हापूरला पराभव पत्कारावा लागला.आजच्या सामन्यात अकोला संघाचा सय्यद नावेद, विशाल क्षीरसागर, नागपूरच्या सौरभ रोकडे, नीलेश मते, मुंबई सिटीच्या गिरीश मोरे, एस. पाठक, पुण्याचा अविराज गायकवाड, तर महिला संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू समीक्षा किणीकर, ऋतुजा कदम, स्नेहा शिंदे, प्रज्ञा वरेकर यांच्या उत्कृष्ट स्मॅशने प्रेक्षकांची मने जिंकली. आज, दिवसभर झालेल्या साखळी सामन्यातील निकाल पुढीलप्रमाणे - पुरुष संघ -लातूर विरुद्ध गोंदिया - लातूर विजयी - १९-२५, २५-१७, १५-८, सिंदुधुर्ग विरुद्ध बुलढाणा - सिंधुदुर्ग विजयी - २५-१६, २५-२३, चंद्रपूर विरुद्ध नंदूरबार - चंद्रपूर विजयी - २५-१९, २५-१७, मुंबई सिटी विरुद्ध बुलढाणा - मुंबई विजयी - २५-१०, २५-१९, नांदेड विरुद्ध पालघर - पालघर विजयी - २६-२४, १३-२५, १६-१४, उस्मानाबाद विरुद्ध अहमदनगर - उस्मानाबाद विजयी - २५-१५, २५-०६, पुणे विरुद्ध ठाणे - पुणे विजयी - २५-२०, २५-१७, नागपूर विरुद्ध सांगली - नागपूर विजयी, नागपूर विरुद्ध अकोला - नागपूर विजयी - २५-१५, २५-२०, मुंबई सिटी विरुद्ध जालना - जालना विजयी - २५-१३, २५-१८, लातूर विरुद्ध हिंगोली - हिंगोली विजयी- २५-२५, २५-२१, १५-१२, सांगली विरुद्ध यवतमाळ - यवतमाळ विजयी - २९-२७, २२-२५, १५-१०, भंडारे विरुद्ध परभणी - परभणी विजयी - २५-१०, २५-१९, रायगड विरुद्ध जळगाव - रायगड विजयी - २५-१२, २५-१८.महिला संघ - नाशिक विरुद्ध कोल्हापूर - नाशिक विजयी- २५-२१, २६-२४, अकोला विरुद्ध अमरावती - अकोला विजयी - २५-०८, २५-१८, पुणे विरुद्ध यवतमाळ - पुणे विजयी - २५-१७, २५-१०, लातूर विरुद्ध सिंधुदुर्ग - लातूर विजयी - २५-०९, २५-११, मुंबई सिटी विरुद्ध जालना - मुंबई सिटी विजयी - २५-०८, २५-०६, नांदेड विरुद्ध पालघर - पालघर विजयी - २५-०३, २५-०७.(वार्ताहर)फोटो - १२१२२०१४-जेएवाय-०४फोटो ओळी - कुरूंदवाड येथे सुरू असलेल्या राज्य अजिंक्यपद व्हॉलिबॉल स्पर्धेतील कोल्हापूर विरुद्ध मुंबई सब यांच्या सामन्यातील कोल्हापूरच्या सर्जेराव तांबडे व सागर डोंगरे हवेत झेप घेऊन स्मॅश मारताना, तर मुंबई सब संघाचा के.पटेल बॅकिंग देताना.