शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Encounter: उत्तर प्रदेश पोलीस एन्काउंटरमध्ये अग्रणी, महाराष्ट्रामध्ये आहे असं चित्र, गृहमंत्रालयाची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 07:53 IST

Encounter News: गेल्या सहा वर्षांत देशभरातील  पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू होण्यात उत्तर प्रदेश आणि छत्तीसगढ अग्रणी आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाच्या  विश्लेषणात्मक अधिकृत आकडेवारीनुसार  गेल्या सहा वर्षांत देशभरात घडलेल्या पोलीस एन्काउंटरमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली :  गेल्या सहा वर्षांत देशभरातील  पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू होण्यात उत्तर प्रदेश आणि छत्तीसगढ अग्रणी आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाच्या  विश्लेषणात्मक अधिकृत आकडेवारीनुसार  गेल्या सहा वर्षांत देशभरात घडलेल्या पोलीस एन्काउंटरमध्ये ८१३ जणांचा मृत्यू झाला. यापैकी ३५४ प्रकरणे  प्रलंबित असून, ४५९ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.  तथापि, ही प्रकरणे कशी निकाली काढण्यात आली, याचा काहीही थांगपत्ता देण्यात आलेला नाही.छत्तीसगढमध्ये गेल्या सहा वर्षांत पोलीस एन्काउंटरमध्घे सर्वाधिक २५९  जणांचा मृत्यू झाला,  तर उत्तर प्रदेशमध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला.  या अवधीत पश्चिम बंगालमध्ये पोलीस एन्काउंटरच्या पाच घटना घडल्या. पंजाबमध्ये या अवधीत ८ घटना घडल्या. एकेकाळी  पोलीस एन्काउंटरसाठी पंजाब ओळखला जायचा. महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत घडलेल्या पोलीस एन्काउंटरच्या  घटनांत ३४ जणांचा मृत्यू झाला. तथापि, गेल्या तीन वर्षांत  पोलीस एन्काउंटरच्या घटना कमी घडल्या आहेत. गेल्या सहा वर्षांत गोव्यातही पोलीस एन्काउंटरची एकही घटना घडली नाही. पोलीस एन्काउंटरच्या एकूण ८१३ घटनांपैकी ३५३ प्रकरणांत अद्याप कारवाई होणे बाकी आहे. पोलीस एन्काउंटरच्या ८१३ घटनांपैकी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने एकाच प्रकरणात शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली आहे, ही बाब विलक्षण असली, तरी खरी आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMaharashtraमहाराष्ट्र