शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

निवडणुकीत आघाडी, मात्र तत्पूर्वी सुप्रीम कोर्टात आमने-सामने आले काँग्रेस आणि AAP, नेमकं प्रकरण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 12:07 IST

AAP Vs Congress: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपममध्ये तीन राज्यांत आघाडी झाली आहे. मात्र एका प्रकरणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये आमने-सामने आले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपममध्ये तीन राज्यांत आघाडी झाली आहे. मात्र एका प्रकरणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये आमने-सामने आले आहेत. हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील जोगिंदरनगर येथे असलेल्या ब्रिटिशकालीन जलविद्युत केंद्र शानन हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या व्यवस्थापनाविषयी  पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

पंजाब सरकारच्या या याचिकेवर पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी होऊ शकते. या याचिकेमध्ये पंजाब सरकारने या प्रकल्पाची ९९ वर्षांची लीज समाप्त झाल्यानंतर हिमाचल सरकारकडून प्रकल्प ताब्यात घेण्याला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे. पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयाला या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. यावर सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी सुनावणीसाठी याचिका लवकरात लवकर सूचिबद्ध करण्याचं आश्वासन देऊन यावर पुढच्या आठवड्यात सुनावणी करणार असल्याचे सांगितले.

पंजाब सरकारने काँग्रेसच्या हिमाचल प्रदेश सरकारला प्रोजेक्टची ९९ वर्षांची लीज संपुष्टात आल्यानंतर प्रकल्पाची देखभाल आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळण्यापासून रोखण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. ही याचिका घटनेतील कलम १३१ अन्वये दाखल करण्यात आली आहे. या कलमांतर्गत दाखल याचिकेवर केवळ सर्वोच्च न्यायालयच सुनावणी करू शकते.

पंजाब सरकारने आपल्या या दिवाणी दाव्यामध्ये म्हटले आहे की, या लीजची समाप्ती अप्रासंगिक आहे. कारण या प्रकल्पाची क्षमता ४८ वरून ११० मेगावॅटपर्यंत वाढवता यावी यासाठी या प्रकल्पाची देखभाल आणि नवीनीकरण राज्य सरकारने स्वत:च्या पैशांमधून केलं आहे. पंजाब सरकारने हिमाचल प्रदेशवर दुर्भावनापूर्ण पद्धतीने हा प्रकल्प आणि वीजघरावर कब्जा केल्याचा आरोप केला आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसAAPआपPunjabपंजाबHimachal Pradeshहिमाचल प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालय