गिलानींच्या रॅलीपूर्वी नेत्यांची धरपकड

By Admin | Updated: November 1, 2015 23:43 IST2015-11-01T23:43:08+5:302015-11-01T23:43:08+5:30

जहाल हुरियत नेते सैयद अली शहा गिलानी यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून पोलिसांनी अनेक फुटीरवादी नेत्यांची धरपकड केली.

Leaders of the leaders before the rally of Gilani | गिलानींच्या रॅलीपूर्वी नेत्यांची धरपकड

गिलानींच्या रॅलीपूर्वी नेत्यांची धरपकड

श्रीनगर : जहाल हुरियत नेते सैयद अली शहा गिलानी यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्रीपासून पोलिसांनी अनेक फुटीरवादी नेत्यांची धरपकड केली. येत्या ७ नोव्हेंबर रोजी ज्या दिवशी मोदी काश्मीरमध्ये आहेत त्याच दिवशी गिलानी सभा घेणार आहेत.
हुरियतच्या उदारमतवादी गटाचे नेते मीरवाईज उमर फारूख यांनी रविवारी गिलानी यांच्या जाहीर सभेस पाठिंबा दिला. फुटीरवादी नेत्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, जेकेएलएफचे प्रमुख मोहम्मद यासीन मलिक, डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टीचे प्रमुख शबीर अहमद शाह व अन्य फुटीरवादी नेत्यांना पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतले.

Web Title: Leaders of the leaders before the rally of Gilani