शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील प्रचारात महाराष्ट्रातील नेते गेले, तिथला निकाल काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2023 07:38 IST

हुबळीच्या तीनपैकी २ ठिकाणी भाजप व एका ठिकाणी काॅंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला तर इंडी आणि धारवाड येथे काँग्रेसने बाजी मारली.

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते गेले होते. आता निकालात तिथे काय झाले, याची सर्वाना उत्सुकता लागली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुबळी, धारवाड आणि इंडी येथे गेले होते. हुबळीच्या तीनपैकी २ ठिकाणी भाजप व एका ठिकाणी काॅंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला तर इंडी आणि धारवाड येथे काँग्रेसने बाजी मारली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कापू आणि उडुपी येथे भाजप उमेदवाराचा प्रचार केला. कर्नाटकचा हा भाग भाजपचा बालेकिल्ला आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निपाणी येथे सभा घेतली होती. मात्र तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही निपाणीला भेट दिली होती. काँग्रेस तिथे तिसऱ्या नंबर राहिली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये प्रचार केला होता. तेथे काँग्रेसने बाजी मारली आहे. ते खानापूर येथेही गेले होते, खानापूरला मात्र भाजपचा विजय झाला.

सरकार पाडणाऱ्या ११ बंडखोरांचा पराभवबेळगाव - कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) सरकारविरोधात बंड केलेल्या १७ आमदारांना कन्नड जनतेने या निवडणुकीत धडा शिकवला. पक्षांतर केलेल्या १७ मतदारसंघांपैकी फक्त ६ ठिकाणी उमेदवारांना आपली आमदारकी वाचवता आली आहे. ११ ठिकाणी काँग्रेस, जनता दलाने विजय मिळवत गद्दारी करणाऱ्यांचे उट्टे काढले आहे. 

पाच मराठा चेहरे -- कर्नाटक विधानसभेच्या नव्या सभागृहात पाच मराठा चेहरे असतील. यातील काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन आमदार असतील. मावळत्या सभागृहात ही संख्या चार होती. या निवडणुकीत मराठा समाजाचे १३ जण रिंगणात होते. - महाराष्ट्र एकीकरण समितीचे तिन्ही उमेेदवार पराभूत झाले. बेळगावच्या खानापुरात भाजपचे विठ्ठल हालगेकर यांनी काँग्रेसच्या अंजली निंबाळकर यांचा पराभव केला. - हावेरी जिल्ह्यातील हनगलमध्ये काँग्रेसचे श्रीनिवास माने यांनी भाजपच्या शिवराज सज्जानर यांचा पराभव केला. - धारवाडच्या कलघटगीत काँग्रेसचे संतोष लाड १४,३५७ मताधिक्याने, कलबुर्गी जिल्ह्यातील चिचोली मतदारसंघात अविनाश जाधव हे अवघ्या ८५८ मताधिक्याने तसेच कारवार मतदारसंघातून काँग्रेसचे सतीश कृष्णा सैल २,१३८ मताधिक्याने विजयी झाले आहेत.  - श्रीमंत पाटील यांचा कागवाड मतदारसंघात भाजपचेराजू कागे यांच्याकडून ८,८२७ मतांनी पराभव झाला.

दावणगिरी दक्षिण मतदारसंघातील कॉंग्रेसचे ९१ वर्षीय उमेदवार एस. शिवशंकरप्पा हे विजयी झाले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस