शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या मुलांना भाजपमध्ये तिकीट नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 09:10 IST

घराणेशाही आणि वंशवादाच्या विरोधात भाजप देशभरात निवडणूक लढवत आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भाजपमध्ये कोणत्याही नेत्याची मुलगी, मुलगा अथवा नातेवाइकाला कदापिही तिकीट मिळणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. घराणेशाही आणि वंशवादाच्या विरोधात भाजप देशभरात निवडणूक लढवत आहे.

काँग्रेससह विरोधी पक्षांना घराणेशाहीवरून घेरल्यानंतर, आता भाजपने तिकीट वाटपाच्या सर्वांत महत्त्वाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या नेत्यांना मोदी यांनी स्पष्ट सांगितले की, कोणी कितीही मोठा नेता असो, कोणाच्याही मुलाला, मुलीला अथवा नातेवाइकाला तिकीट मिळता कामा नये. तिकीट वितरणात युवक व महिलांना जास्तीतजास्त संधी मिळाली पाहिजे. एखाद्या जागी एखादा युवक नेता अनुभवी नेत्याच्या तुलनेत थोडासा कमी प्रभावी असला, तरीही युवक व महिलांना तिकीट दिले जावे.

अर्ध्या मंत्र्यांचे तिकीट कापण्याची शक्यता

- मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन्ही विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. - आधी मध्य प्रदेशबाबत बैठक झाली. यात राज्यातील भाजप सरकारची १९ वर्षांची अँटी इन्कम्बन्सी व सत्ताविरोधी मत कमी करण्यासाठी अर्ध्यापेक्षा अधिक आमदारांचे तिकीट कापण्यावर चर्चा झाली.- काही अवघड जागा जिंकण्यासाठी सुमारे १२ खासदारांनाही विधानसभा निवडणुकीत उतरविण्याबाबत चर्चा झाली.- भाजपच्या विद्यमान २३० जागांच्या विधानसभेत भाजपचे १२२ आमदार आहेत. यात जिंकणाऱ्या आमदारांची संख्या ३० ते ३५ सांगितली जात आहे.- भाजप जिंकणाऱ्या जागा आज निश्चित करण्यात आल्या. त्याचबरोबर, सुमारे ६० अशा जागा आहेत, जेथे भाजप स्पर्धेत आहे.

 

टॅग्स :lok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण