लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री
By Admin | Updated: November 9, 2014 02:45 IST2014-11-09T02:45:06+5:302014-11-09T02:45:06+5:30
मनोहर र्पीकरांचे उत्तराधिकारी म्हणून भाजपा संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर लागलीच गोव्याचे 22वे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता शपथ घेतली.

लक्ष्मीकांत पार्सेकर गोव्याचे मुख्यमंत्री
पणजी : मनोहर र्पीकरांचे उत्तराधिकारी म्हणून भाजपा संसदीय मंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर लागलीच गोव्याचे 22वे मुख्यमंत्री म्हणून लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी सायंकाळी चार वाजता शपथ घेतली. पार्सेकरांच्या मंत्रिमंडळात नाराज फ्रान्सिस डिसुझा यांचाही समावेश झाला आह़े
गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी 9 मंत्र्यांसह पार्सेकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. डिसुझा यांच्याबरोबरच रामकृष्ण ऊर्फ सुधीर ढवळीकर, दयानंद मांजरेकर, रमेश दौडकर, महादेव नाईक, दिलीप परुळेकर, मिलिंद नाईक, पांडुरंग ऊर्फ दीपक ढवळीकर आणि श्रीमती अलिना सौदानिया या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्याआधी दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय निरीक्षक राजीव प्रताप रुडी व बीएस येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या गोव्यातील सर्व 24 आमदारांची र्पीकरांच्या उपस्थितीतच बैठक झाली. त्यात पार्सेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. सकाळी दिल्लीत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या संसदीय बोर्डाची बैठक पार पडली. यात संघाचे स्वयंसेवक असेलल्या पार्सेकर
यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
मराठीतून शपथ
मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मराठीतून शपथ घेतली. मराठीतून शपथ घेणारे अलीकडील 35 वर्षातील ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. राज्यात तीन वेळा भाजपाचे सरकार अधिकारावर आले; पण र्पीकर यांच्यानंतर दुसरे कुणीच मुख्यमंत्री झाले नव्हते. पार्सेकर हे दुसरे ठरले.