गोहत्या करणा-यांचे हात-पाय तोडणार, भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

By Admin | Updated: March 26, 2017 09:46 IST2017-03-26T09:45:48+5:302017-03-26T09:46:22+5:30

जे लोकं गाईला मानत नाही आणि तिची हत्या करतात, अशा लोकांचे मी हात -पाय तोडायला लावेन

The lawmakers will break the hands and feet of cow slaughter, BJP MLA's controversial statement | गोहत्या करणा-यांचे हात-पाय तोडणार, भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

गोहत्या करणा-यांचे हात-पाय तोडणार, भाजपा आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

>ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरनगर, दि. 26 - उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार विक्रम सैनी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गोहत्या करणा-यांचे हात पाय तोडायला लावेन असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशमधील राज्यमंत्री सुरेश राणा यांच्या सत्कार समारंभात त्यांनी हे विधान केलं.  
 
जे लोकं गाईला मानत नाही आणि तिची हत्या करतात, अशा लोकांचे मी हात -पाय तोडायला लावेन अशी धमकीच त्यांनी दिली. तसेच जो वंदे मातरम म्हणत नाही किंवा भारत माता की जय म्हणताना ज्याला अभिमान वाटत नाही त्यांचेही हात- पाय तोडायला लावणार असे ते म्हणालेत. वर्णी लागल्यावर सुरेश राणा शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये आले होते. राणा यांच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सैनी यांनी हे चिथावणीखोर विधान केलं आहे. 
 
युद्धप्रसंगी चीन आणि पाकिस्तानविरोधात सीमा रेषेवर पगार न घेताही लढू शकते अशी  तरुणांची टीम माझ्याकडे आहे असा दावाही त्यांनी केला. मुझफ्फरमध्ये झालेल्या दंगलीदरम्यान सैनी यांना तुरूंगाची हवा खावी लागली होती. 
 
योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यापासून तेथे कत्तलखान्यांवर कारवाई होत आहे. 

Web Title: The lawmakers will break the hands and feet of cow slaughter, BJP MLA's controversial statement