शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

'योगींची कायदा सुव्यवस्था निकामी'; हत्येनंतर एमआयएम अन् सपा नेत्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 00:10 IST

झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते

प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपींचा एन्काऊटर करण्यात आला होता. अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर, आता या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मीडियाला बाईट देत असतानाच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे, या हत्येचा व्हिडिओ लाईव्ह रेकॉर्ड झाला असून तो व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेवरुन सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे. मात्र, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि एमआयएमचे नेते असुदुद्दीन औवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.   झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी  माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. विशेष म्हणजे आज मुलाच्या दफनविधीसाठीही त्याला नेले नव्हते. आज प्रयागराज येथील रुग्णालयात नेत असताना अतिक आणि अश्रफ यांच्यावर गोळीबार झाला. या घटनेचा थरार व्हिडिओत कैद झाला असून सोशल मीडियावर अतिक अहमद ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. एकीकडे या हत्येचं समर्थन होत असताना दुसरीकेड समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी या घटनेवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 

उत्तर प्रदेशात गुन्हेगारीने सीमा ओलांडली आहे. आरोपींचा जोश वाढत आहे. जर पोलिसांच्या घेरावमध्ये घुसून कोणाची तरी हत्या करण्यात येत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचं काय?, असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला आहे. तसेच, या घटनांमुळे जनेतेमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून काही लोकं जाणीवपूर्वक असं वातावरण निर्माण करत असल्याचं वाटतं, असेही यादव यांनी म्हटले. 

अतिक आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात होते, त्यांच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. यावेळी, जय श्रीरामचेही नारे देण्यात आले. या दोघांची हत्या योगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा नाकामीपणा आहे,  तर एन्काऊंटर जश्न साजरा करणारेही या हत्येस जबाबदार आहेत, असे म्हणत एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 

असद आणि गुलावचा दफनविधी

दरम्यान, आजच असदच्या सुपूर्द ए-खाक ची रस्म पूर्ण करताना पोलिसांकडून ड्रोनने निगराणी करण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता झांसी येथून प्रयागराजला असद व गुलाम यांचे पार्थिव आणण्यात आले होते. त्यानंतर, असदचे शव थेट कसारी-मसारी कब्रस्तानमध्ये नेण्यात आले. तर, गुलामवर मेहदौरी कब्रस्तान येथे दफविधी करण्यात आला. दरम्यान, दोघांच्याही दफनविधीवेळी पल्बीक आणि मीडियाला दूरवरच उभे केले होते. केवळ, जवळच्या २५ नातेवाईकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मुलाच्या दफनविधीसाठीही अतिकला नेण्यात आलं नव्हतं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAkhilesh Yadavअखिलेश यादव