...तर ४८ तासात देशातील कायदा-सुव्यवस्था गंभीर होईल
By Admin | Updated: November 14, 2016 20:38 IST2016-11-14T19:30:59+5:302016-11-14T20:38:59+5:30
नोटबंदींमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या ४८ तासात चलन पुरवठा सुरळीत नाही झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी सरकरला

...तर ४८ तासात देशातील कायदा-सुव्यवस्था गंभीर होईल
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - नोटबंदींमुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या ४८ तासात चलन पुरवठा सुरळीत नाही झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी सरकरला दिले आहे. असे वृत्त एबीपी न्युजने दिले आहे. दोन दिवसात एटीएम आणि बँकांमध्ये चलन पुरवठा पुर्वरत न झाल्यास गर्दीला संभाळणे नियंत्रणेबाहेर जाईल अस राज्याने केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.
स्वार्थी आणि असामाजिक तत्व समाजात सक्रिय झाले आहेत. ज्यांचं सरकारच्या निर्णयाने नुकसान झालं आहे, ते लोक नागरिकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत, असं गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात म्हटलं आहे.