तुळजापुरात काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ
By Admin | Updated: September 23, 2014 05:03 IST2014-09-23T05:00:46+5:302014-09-23T05:03:02+5:30
येत्या ३० सप्टेंबर रोजी तुळजापूर येथे जाहीर सभा घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी दिली.

तुळजापुरात काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ
तुळजापूर : येत्या ३० सप्टेंबर रोजी तुळजापूर येथे जाहीर सभा घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी दिली. काँग्रेस सरकारने गेल्या पाच वर्षांत भरीव विकासकामे केली आहेत. या विकासकामांच्या बळावरच आम्ही मते मागणार असल्याचेही ते म्हणाले.
हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होती.
तुळजापूर येथे होणारी पहिली प्रचारसभा सर्वार्थाने ऐतिहासिक होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच या सभेला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, निवडणूक प्रचारप्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, राजेंद्र दर्डा, पतंगराव कदम, अब्दुल सत्तार यांच्यासह महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे पाटील म्हणाले.