उजनीचे पाणी लातूरकरांना मिळणार खा़सुनील गायकवाड यांची पत्रपरिषदेतील माहिती
By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30
लातूर : लातूरकरांच्या पीण्याच्या पाण्याची समस्या मार्गीलागली असून मुख्यमंत्र्यांनी उजनीचे पाणी देण्याच्या सूचना दिल्या आहेेत़त्याच्या सर्व्हेक्षणाचे कामही सुरू झाले आहे़ त्यामुळे लातूरकरांना पाणी टंचाईच्या काळात उजनीचे पाणी मिळणार असल्याची माहिती खा़ सुनिल गायकवाड यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली़

उजनीचे पाणी लातूरकरांना मिळणार खा़सुनील गायकवाड यांची पत्रपरिषदेतील माहिती
ल तूर : लातूरकरांच्या पीण्याच्या पाण्याची समस्या मार्गीलागली असून मुख्यमंत्र्यांनी उजनीचे पाणी देण्याच्या सूचना दिल्या आहेेत़त्याच्या सर्व्हेक्षणाचे कामही सुरू झाले आहे़ त्यामुळे लातूरकरांना पाणी टंचाईच्या काळात उजनीचे पाणी मिळणार असल्याची माहिती खा़ सुनिल गायकवाड यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली़खा़ गायकवाड म्हणाले लातूरकरांना पाणी टंचाई भासूनये म्हणून मागे घेण्यात आलेलेल्या बैठकीत महापालिका प्रशासनास आणि महाराष्ट्र जिवणप्राधीकरणच्या अधिकार्यांना सूचना देण्यात आल्या होत्या़ पाण्याचा होणारा वापर आणि जुण्या पध्दतीची यंत्रणा बदलून आहेतेच पाणी लातूरकरांना दररोज किमान दोन तास पाणी मिळेल अशी यंत्रणा उभाकेली जाऊशकते़ त्यासाठी कंद्रे शासनाची मदत ही मिळूशकते यासाठी महापालिकेतील शिष्टमंडळाने दिल्लीला यावे अशा सूचना दिल्या होत्या पण महापालिकेकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही़ राज्यात सरकार बदलले आहे़ पण प्रशासनातील अधिकार्यांच्या मानसिकता बदलण्याची गरज आहे़ महाराष्ट्र जीवण प्राधिकरण यांच्या वादात पाण्याचा अपव्यय होत आहे़ पालिका प्रशासनाला वेळोवेळी याची जाणीव करून देवून ही त्याबाबत महापालिका प्रशासन सुस्त असल्याचे एैकण्यात येत आहे़ याबाबत माहापालिका प्रशासन आणि संबंधीताची चौकशीकरून याकामी निष्काळजीपणा निदर्शनास दिसून आल्यास त्यांच्यावर कार्यवायी करण्याची शिफरस ही मुख्यमंत्र्याकडे यांची तक्रार करून त्यांच्यावर कार्यवाई केली जाईल असेही खा़ गायकवाड यांनी सांगीतले़आधिवेशनाच्या या काळात जनहिताचे प्रश्न विचारण्यात आले आहेत़ लातूर मुुंबई रेल्वे ही परळीपर्यंत घेवून जाण्यासाठी प्रयत्न होत आहेत़ त्यासाठी खा़ गांधी व खा़ डॉ़प्रितम मुडे यांचे शिष्टमंडळ रेल्वे मंत्र्यांना भेटले आहे़ मलाहि खा़ गांधी यांनी शिफारस पत्राची मागणी केली होती़त्यांना शिफारस पत्र देणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले़ लातूर मुंबई ही रेल्वे १६ तासउभी राहाते ती लातूर पुणे शटल ट्रेन सुरू करावी अशी मागणीही केली असल्यांचे त्यांनी यावेळी सांगीतले़ यावेळीपत्र परिषदेस शैलेश लाहोटी , मोहन माने, पंकज काटे, आदींची उपस्थिती होेती़