अधिकार्यांच्या छळास कंटाळून लातूरच्या शिक्षकाची कोल्हापुरात आत्महत्या शाहुवाडी पोलिसात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: September 4, 2015 23:12 IST2015-09-04T23:12:36+5:302015-09-04T23:12:36+5:30
लातूर : अधिकार्यांकडून वारंवार होणार्या छळास कंटाळून लातूरच्या शिक्षकांनी कोल्हापूर जिल्ात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १ सप्टेंबरच्या रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ातील शाहूवाडी पोलिस ठाण्यात तीन अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकार्यांच्या छळास कंटाळून लातूरच्या शिक्षकाची कोल्हापुरात आत्महत्या शाहुवाडी पोलिसात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल
ल तूर : अधिकार्यांकडून वारंवार होणार्या छळास कंटाळून लातूरच्या शिक्षकांनी कोल्हापूर जिल्ात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना १ सप्टेंबरच्या रात्री ११.३० वाजता घडली. याप्रकरणी कोल्हापूर जिल्ातील शाहूवाडी पोलिस ठाण्यात तीन अधिकार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लातूर शहरातील मोतीनगर भागात राहणारे रतन अशोक तळीखेडकर हे कोल्हापूर जिल्ातील गावडी-पाटीलवाडी ता. शाहूवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या कांही माहिन्यांपासून रतन यांना मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वेगवेगळ्या कारणावरुन छळ करित होते. याप्रकरणी त्यांनी आपल्या घरच्यांना या छळाबाबत वेळोवळी माहिती दिली होती. सतत गैरहजर राहतो असे म्हणत मुख्याध्यापक निवृत्ती पांडुरंग भूमकर, केंद्रप्रमुख एस. आर. माने आणि शाहूवाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. पी. भांगरे यांनी संगनमत करुन रतन तळीखेडकर यांचा मानसिक आणि शारिरिक छळ केला. अखेर या छळास रतन तळीखेडकर यांनी कंटाळून येळाने ता. शाहुवाडी येथील आपल्या मित्राच्या खोलीवर १ सप्टेंबरच्या रात्री ११.३० वाजता गळफास घेउन आत्महत्या केली. याप्रकरणी अशोक दत्तात्रय तळीखेडकर यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तीन अधिकार्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप एकाही आरोपी अटक करण्यात आली नाही.