जिल्हा परिषदेच्या शाळांना संगणक भेट लातूर पंचायत समितीचा उपक्रम : २४ शाळांना प्रत्येकी एक संगणक
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30
लातूर : लातूर पंचायत समितीच्या वतीने पंचायत समिती सेस फंडातून लातूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २४ शाळांना संगणक भेट देण्यात येणार आहेत़ त्याचे पंचायत समिती सदस्यांकडून मुख्याध्यापकांना पंचायत समिती सभापती रावसाहेब भालेराव, उपसभापती ॲड़ लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते बुधवारी संगणक वितरीत करण्यात आले़

जिल्हा परिषदेच्या शाळांना संगणक भेट लातूर पंचायत समितीचा उपक्रम : २४ शाळांना प्रत्येकी एक संगणक
ल तूर : लातूर पंचायत समितीच्या वतीने पंचायत समिती सेस फंडातून लातूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २४ शाळांना संगणक भेट देण्यात येणार आहेत़ त्याचे पंचायत समिती सदस्यांकडून मुख्याध्यापकांना पंचायत समिती सभापती रावसाहेब भालेराव, उपसभापती ॲड़ लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते बुधवारी संगणक वितरीत करण्यात आले़ ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणक साक्षर व्हावे, त्यांना संगणक हाताळता यावे, या उद्देशाने लातूर पंचायत समितीने पंचायत समितीच्या सेस फंडातून तालुक्यातील २४ शाळांना संगणकाची भेट दिली़ या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती राजेसाहेब भालेराव हे होते़ यावेळी पंचायत समितीचे उपसभापती ॲड़ लक्ष्मण पाटील, माजी सभापती मंगलप्रभा घाडगे, माजी उपसभापती श्रीनिवास शेळके, इंदुमती वाघमारे, रेखा मुळे, रंजना वैद्य, राजश्री गावकरे, संगिता पतंगे, व्यंकट पाटील, सय्यक जहांगीर, दिपमाला मस्के, प्रदिप माळी, सत्यशीला पाटील, मनिषा गायकवाड, बाळासाहेब कदम, गोपीनाथ देवकर, अंकुश कांबळे, गटविकास अधिकारी धनवंतकुमार माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी शिवाजी पन्हाळे यांनी केले़ आभार डी़ बी़ पोतदार यांनी मानले़ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय आलमले, डी़ एस़ गिते आदींनी परिश्रम घेतले़