शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

महाराष्ट्र सदनात लातूरच्या खासदाराला अपमानास्पद वागणूक

By admin | Published: July 17, 2017 10:28 PM

महाराष्ट्र सदनात लातूरच्या भाजपा खासदाराला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 17 - महाराष्ट्र सदनात लातूरच्या भाजपा खासदाराला अपमानास्पद वागणूक मिळाल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येथील कँटीनचे प्रशासन वादात सापडले आहे. टेबल बूक असल्याचे सांगत भाजपाच्या लातूरच्या खासदाराला काऊंटरवरील मॅनेजरने तब्बल अर्धा तास बसू दिले नाही. भाजपाचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड हे सोमवारी महाराष्ट्र सदनमध्ये गेले होते. खासदार व आमदारांसाठीच्या कक्षामध्ये तेव्हा कोणाची तरी पार्टी सुरु होती. त्यामुळे खा. सुनिल गायकवाड हे सामान्य कक्षात गेले तेथे काऊंटर मॅनेजरने त्यांना कुठेतरी बसा असे सांगितले. त्यावर त्यांनी मी खासदार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर खा. गायकवाड हे एका टेबलाकडे गेले तेव्हा एक वेटर तेथे आला व हा टेबल बुक असल्याचे त्याने सांगितले. गायकवाड यांना वेटरने तेथे बसू दिले नाही. अर्धा तास त्या टेबलाकडे कोणीही आले नाही. तोपर्यंत खा. गायकवाड हे उभेच होते.या सर्व प्रकारावर खा. गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कँटीन प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी अभिप्राय पुस्तिकेत केली आहे. लोकप्रतिनिधीला कँटीन प्रशासनाने दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा -  
व्यंकय्या नायडू एनडीएचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार
चालत्या रेल्वेत बसणे गुन्हा नाही
नरेंद्र मोदींनी आचरणात आणली लोकांची ही सूचना

या आधीही झाला होता वाद?2014 मध्ये रमजानच्या महिन्यात महाराष्ट्र सदनात एका मुस्लीम कर्मचा-याला बळजबरीने चपाती खायला लाऊन त्याचा रोजा मोडल्याचे प्रकरण झाले होते. महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळणारी वागणूक, राहण्याची व खाण्यापिण्याची निकृष्ट दर्जाची सोय यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदारांनी सदनातील कर्मचा-याला बळजबरीने चपाती भरवली होती. मात्र तो कर्मचारी मुसलमान होता व तेव्हा त्याचा रमजानचा उपवास सुरू असल्याने या प्रकरणी मोठा गदारोळ माजला होता. भाजप-शिवसेनेचे नवनियुक्त खासदार निवडून आल्यापासून नवीन महाराष्ट्र सदनात वास्तव्य करत होते. मात्र त्यांना तेथे चांगल्या सोयी-सुविधा दिल्या जात नव्हत्या. या गैरसोयींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे खासदार महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना वारंवार भेटण्याचा पयत्न करीत होते. मात्र, निवासी आयुक्तांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. एकदा मलिक यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली मात्र ते भेटलेच नाहीत. यामुळे त्यांच्यावरील राग कँटीनच्या मॅनेजरवर निघाला. जेवण नीट नसल्यामुळे सेनेचे खासदार राजन विचारे यांनी मॅनेजरला बोलावले आणि पोळी खावून दाखविण्यास सांगितले. त्याने पोळी खाल्ली नाही म्हणून विचारे यांनी स्वतः मॅनेजरच्या तोंडाला पोळी लावली. मात्र तो मुस्लीम असून त्याने रोजा ठेवला आहे याची माहिती त्यांना नव्हती. रोजाचा उपवास मोडल्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ माजला. विरोधकांनी या मुद्यावरून संसदेचे कामकाजही बंद पाडले होते.