ओव्हरलोड वाहतुकीचा दंड कोटींवर लातूर विभाग : अंमलबजावणी पथकाची कामगिरी लातूर : ओव्हरलोड, अवैध प्रवासी वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाई
By Admin | Updated: July 12, 2015 21:58 IST2015-07-12T21:58:16+5:302015-07-12T21:58:16+5:30
लातूर, उस्मानाबाद, उमरगा व अंबाजोगाई येथे ओव्हरलोड वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने नियुक्ती केलेल्या अंमलबजावणी पथकाने गेल्या तीन महिन्यांत कोट्यवधींचा दंड व कर वसूल केला आहे़ तसेच उमरगा येथील सीमा तपासणी नाक्यावर ओव्हरलोड, अवैध प्रवासी वाहतूक आणि कागदपत्र तपासणी केली जाते़ याठिकाणी गेल्या तीन महिन्यांत जवळपास ३ कोटी रूपयांचा दंड व कर वसूल करण्यात आला आहे़ वाहनांना ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणार्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने विशेष लक्ष केले असून संशय येणार्या वाहनांची खात्री करून अधिक भार असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे़ लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंमलबजावणी पथकाने गेल्या तीन महिन्यात कोट्यवधी रूपयांचा महसू

ओव्हरलोड वाहतुकीचा दंड कोटींवर लातूर विभाग : अंमलबजावणी पथकाची कामगिरी लातूर : ओव्हरलोड, अवैध प्रवासी वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर कारवाई
ल तूर, उस्मानाबाद, उमरगा व अंबाजोगाई येथे ओव्हरलोड वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने नियुक्ती केलेल्या अंमलबजावणी पथकाने गेल्या तीन महिन्यांत कोट्यवधींचा दंड व कर वसूल केला आहे़ तसेच उमरगा येथील सीमा तपासणी नाक्यावर ओव्हरलोड, अवैध प्रवासी वाहतूक आणि कागदपत्र तपासणी केली जाते़ याठिकाणी गेल्या तीन महिन्यांत जवळपास ३ कोटी रूपयांचा दंड व कर वसूल करण्यात आला आहे़ वाहनांना ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणार्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने विशेष लक्ष केले असून संशय येणार्या वाहनांची खात्री करून अधिक भार असल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे़ लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या अंमलबजावणी पथकाने गेल्या तीन महिन्यात कोट्यवधी रूपयांचा महसूल वसूल केला आहे़ २४२ वाहनांची नोंदणी रद्द़़अवैध प्रवासी वाहतूक करणार्या ४८ बसेसवर कारवाई करण्यात आली आहे़ त्यापैकी ३४ बस पथकाने जप्त केल्या़ कारवाई करण्यात आलेल्या खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या बसेसकडून ९ लाख २९ हजार २३५ रूपये दंड आणि कर वसूल करण्यात आला आहे़ तर इतर ४२५ वाहनांवर कारवाई करून १७ लाख ६६ हजार ३११ रूपये वसूल करण्यात आले आहेत़ अवैध प्रवासी वाहतूक करताना विभागात आढळून आलेल्या २४२ वाहनांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत़ स्कुलबसवर कारवाई़़़लातूर विभागात असलेल्या उस्मानाबाद, अंबाजोगाई, लातूर व उमरगा येथे शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केल्याप्रकरणी २१ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ लातूर शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने आहेत, या वाहनांवर अंमलबजावणी पथकाची विशेष नजर असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ़ डी़टी़पवार यांनी सांगितले़ विनापरवाना जनावरांची वाहतूक १२०, ऑटोरिक्षाचालकांना गणवेश २७ आणि हेल्मेट न लावता दुचाकी चालविणार्या ४८ जणांवर कारवाई करण्यात आल्याचेही पवार यांनी सांगितले़