शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

68 लाख फेसबुक युजर्सच्या फोटोंचा गैरवापर; तुम्ही नाही ना यातले एक? 'असं' करा चेक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 1:40 PM

फेसबुकवर युजर्सचा डेटा लीक होण्याचा धोका आहे. 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता, अशी माहिती आता समोर आली आहे.

ठळक मुद्दे68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता अशी माहिती आता समोर आली.फोटोचा गैरवापर झाला की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. 13 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत युजर्सच्या खासगी फोटोंसंबंधी जवळपास 1500 अॅप्सला हा अॅक्सेस देण्यात आला होता.

नवी दिल्ली - फेसबुक हे संवाद साधण्याचं उत्तम माध्यम आहे. मात्र सातत्याने फेसबुकवर युजर्सचा डेटा लीक होण्याचा धोका आहे. 68 लाख युजर्सच्या खासगी फोटोंचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता अशी माहिती आता समोर आली आहे. पण या फोटोचा गैरवापर झाला की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकारामुळे पुन्हा एकदा फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर अपलोड करण्यात आलेले युजर्सचे खासगी फोटो पाहण्याचा अॅक्सेस थर्ड पार्टीला मिळाला होता. कंपनीने दिलेल्या एका वृत्तानुसार, 13 डिसेंबर ते 25 डिसेंबरपर्यंत युजर्सच्या खासगी फोटोंसंबंधी जवळपास 1500 अॅप्सला हा अॅक्सेस देण्यात आला होता. मात्र त्यानंतर ही चूक आता सुधारण्यात आली आहे.  परंतु, या दरम्यान, या फोटोचा गैरवापर झाला की नाही, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, थर्ड पार्टी अॅपला टाईमलाइनशिवाय स्टोरीजमधील शेअर करण्यात आलेल्या फोटोला हा अॅक्सेस देण्यात आला होता. यावेळी तुम्ही तुमचे खासगी फोटो अपलोड केले परंतु, ते पब्लिकली शेअर केले नव्हते. त्या फोटोंना सुद्धा शेअर करण्याचा अॅक्सेस थर्ड पार्टीला या दरम्यान मिळाला होता, त्यामुळे तुमच्या फोटोचा गैरवापर झाला की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

असं करा चेक 

- फेसबुकच्या या बगमुळे तुमच्या फोटोजला काही धक्का लागला की नाही. हे तपासण्यासाठी तुम्ही या लिंक वर क्लिक करू शकतात.

 - लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंटवरून लॉग इन करावे लागणार आहे.

- जर तुमच्या फोटोला काही धक्का लागला असेल तर तुम्हाला काय करावे लागेल, यासंबंधीची सर्व माहिती या पेजवर देण्यात आली आहे.  

टॅग्स :Facebookफेसबुक