शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

लॅटरल एंट्री : आरक्षण तर असायलाच हवं...! UPSC च्या भरतीवरून NDA मध्ये फूट; JDU-LJP चाही विरोधकांच्या सुरात सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 09:32 IST

UPSC कडून शनिवारी लॅटरल एंट्रीद्वारे 45 पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी याविरोधात मोर्चा उघडला. यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही याला विरोध केला. तर सोमवारपर्यंत यासंदर्भात एनडीएतील घटक पक्षांची नाराजीही समोर आली.

सध्या युपीएससीतील लॅटरल एंट्रीच्या मुद्द्यावरू देशात राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारमध्ये 45 वरिष्ठ अधिकाऱ्यांची ‘लॅटरल एंट्री’द्वारे नियुक्ती करण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवरऱ्यात सापडला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात यूपीएससीच्या अधिसूचनेवर केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी एनडीएतील पक्षांतूनही विरोध होताना दिसत आहे. एनडीएतील नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास पासवान)ही या निर्णयाचा विरोध केला आहे. यांच्या मते, कुठल्याही सरकारी भरतीमध्ये आरक्षणाशीची तरतूद असणे आवश्यक आहे. 

याशिवाय, चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) नोकरशाहीतील 'लॅटरल एंट्री'च्या समर्थनात दिसत आहे. तसेच, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षासह अनेक विरोधी पक्षांनीही लॅटरल एन्ट्रीद्वारे भरती करण्यावर आक्षेप नोंदवला आहे.

UPSC कडून शनिवारी लॅटरल एंट्रीद्वारे 45 पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी याविरोधात मोर्चा उघडला. यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनीही याला विरोध केला. तर सोमवारपर्यंत यासंदर्भात एनडीएतील घटक पक्षांची नाराजीही समोर आली.

'सरकारी नौकरी में आरक्षण होना चाहिए' -यासंदर्भात PTI सोबत बोलताना एलजेपीचे (रामविलास) अध्‍यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, "कुठल्याही सरकारी नियुक्तीत आरक्षणाची तरतूद असायला हवी. यात कसल्याही प्रकारे किंतु परंतु नाही. खाजगी क्षेत्रात आरक्षण नाही आणि जर सरकारी पदांवरही ते लागू केले जात नाही... ही माहिती रविवारी माझ्या निदर्शनास आली आणि हा माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. तसेच, आपला पक्ष अशा प्रकारच्या निर्णयांचे कदापी समर्थन करत नाही."

"विरोधकांना मुद्दा देत आहे सरकार" -जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी द इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना म्हणाले, "आम्ही पहिल्यापासूनच सरकारांना आरक्षण भरण्यासंदर्भात मागणी करत आहोत. आम्ही राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी आहोत. शतकानुशतके लोक सामाजिकदृष्ट्या वंचित असताना आपण योग्यता का मागत आहात? सरकारचा हा आदेश आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. असे करून सरकार विरोधकांना मुद्दा देत आहे. एनडीएला विरोध करणारे लोक याचा दुरुपयोग करतील."

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगCentral Governmentकेंद्र सरकारNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीRahul Gandhiराहुल गांधी