लता मंगेशकर या ‘सो कॉल्ड’ गायिका!

By Admin | Updated: June 2, 2016 02:57 IST2016-06-02T02:57:08+5:302016-06-02T02:57:08+5:30

तन्मय भट या कॉमेडियनने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर हीन दर्जाचा विनोद केल्याची घटना ताजी असतानाच आता ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील दैनिकाने लतादिदींना

Lata Mangeshkar or 'So Called' singer! | लता मंगेशकर या ‘सो कॉल्ड’ गायिका!

लता मंगेशकर या ‘सो कॉल्ड’ गायिका!

नवी दिल्ली : तन्मय भट या कॉमेडियनने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यावर हीन दर्जाचा विनोद केल्याची घटना ताजी असतानाच आता ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील दैनिकाने लतादिदींना ‘सो कॉल्ड’ म्हणजे तथाकथित गायिका संबोधल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एआयबी या यूट्युब वाहिनीवर मंगेशकर यांच्याबद्दल भट याने खालच्या स्तरावरचे विनोद केले होते. भटच्या या व्हिडिओवर लिहिलेल्या एका लेखात ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ही टिपणी केली आहे. लता मंगेशकर या ४० च्या दशकात गायन सुरू करणाऱ्या ‘सो कॉल्ड पार्श्वगायिका’ असल्याचे या लेखात म्हटले आहे.
या लेखात भट याने केलेल्या विनोदावर अधिक भाष्य न करता मुंबई पोलिसांनी यूट्युब व फेसबुककडे भटचा हा व्हिडिओ काढून टाकण्याची जी विनंती केली आहे, त्यावरच अधिक चर्चा करण्यात आली
आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Lata Mangeshkar or 'So Called' singer!