अंतिम टप्प्यात भाजपाने बाह्या सरसावल्या

By Admin | Updated: May 8, 2014 11:56 IST2014-05-08T11:38:35+5:302014-05-08T11:56:53+5:30

लोकसभा निवडणुकीच्या ४१ जागांसाठीचा अंतिम टप्प्याचे मतदान उरले असताना भारतीय जनता पार्टी(भाजपा) आणि काँग्रेसमधील लढाई आणखी निकराला पोहोचली आहे़

In the last phase, BJP has started | अंतिम टप्प्यात भाजपाने बाह्या सरसावल्या

अंतिम टप्प्यात भाजपाने बाह्या सरसावल्या

हरीश गुप्ता, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या ४१ जागांसाठीचा अंतिम टप्प्याचे मतदान उरले असताना भारतीय जनता पार्टी(भाजपा) आणि काँग्रेसमधील लढाई आणखी निकराला पोहोचली आहे़ बुधवारी दिवसभराच्या घडामोडी भाजपा आणि त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणखी प्रचाराला बळ देणार्‍या ठरल्या़ इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी सीबीआयने मोदींचे निकटस्थ अमित शहा यांना दिलेली क्लीनचिट, भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी-वड्रा यांच्या पीएला अमेठीतून घ्यायला लावलेली माघार आणि सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या गुजरात जमीन अधिग्रहण धोरणाची स्तृती करणारा अभ्यासासंदर्भात वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांना स्पष्टीकरण देण्यात आलेले अपयश यांमुळे भाजपाला आणखी बळ मिळाले़ मोदींची कथित भूमिका असलेल्या हेरगिरी प्रकरणी सरकारला काल घ्यावी लागलेली माघार आणि त्यापाठोपाठ या सर्व घटना भाजपाच्या पथ्यावर पडल्या़ सीबीआय सूत्रांच्या मते, इशरत जहाँ प्रकरणातील अमित शहा यांना सीबीआयने सरसकट क्लिनचीट दिली असे म्हणता येणार नाही़ केवळ अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपी करण्याएवढा पुरावा आम्ही केलेल्या तपासात मिळालेला नाही,असे लेखी निवेदन सीबीआयने इशरत जहाँ प्रकरणाची सुनावणी करणार्‍या अहमदाबाद येथील विशेष न्यायालयात सादर केले आहे़ पण तरीही सीबीआयचे लेखी निवेदन क्लिनचिट मानून भाजपाच्या अंगात बळ संचारले आहे़ उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि अन्य राज्यांतील ६४ जागांसाठीचे मतदान सुरु असतानाच शाह यांना क्लिनचिट मिळणे भाजपा हाती जणू एखादे मोठे शस्त्र लागल्यासमान आहे़ वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांच्या औद्योगिक धोरण आणि नियोजन खात्याने विविध राज्यांच्या विविध धोरणांसदर्भात जारी केलेल्या अहवालही भाजपासाठी जमेचा ठरला आहे़ असेन्चर या खासगी कंपनीने हा अहवाल तयार केला आहे़ मोदींच्या भूमी अधिग्रहण धोरणाचे गुणगान करणारा हा अहवाल मंगळवारी संध्याकाळी अपलोड करण्यात आला़ मोदींच्या भ्रष्ट भूमी अधिग्रहण धोरणावर सतत टीका करणार्‍या काँग्रेसची या अहवालामुळे कुचंबणा झाली़ आनंद शर्मा यांनी हा खासगी अभ्यास असून सरकारचे याच्याशी काहीही देणेघेणे नसल्याचे सांगून नामनिराळे राहण्याचा प्रयत्न केला आहे़ तिकडे अमेठीच्या भाजप उमेदवार स्मृती इराणी आणि प्रियंका गांधी यांच्या पीए प्रीती साहू यांच्यातील बाचाबाचीही आज अनेकांनी याची डोळा याची देही पाहिली़इराणींच्या या आक्षेपानंतर निवडणूक आयोगाने प्रीती साहू यांना अमेठी सोडून जाण्याचे आदेश दिले़ तशात संध्याकाळ होताहोता आणखी एक अध्याय रंगला तो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या वाराणशीतील रॅलीच्या परवानगीचा. उत्तरप्रदेश, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि अन्य राज्यांतील ६४ जागांसाठीचे मतदान सुरु असतानाच शाह यांना क्लिनचिट मिळणे भाजपा हाती जणू एखादे मोठे शस्त्र लागल्यासमान आहे़ सीबीआय सूत्रांच्या मते, इशरत जहाँ प्रकरणातील अमित शहा यांना सीबीआयने सरसकट क्लिनचीट दिली असे म्हणता येणार नाही़ केवळ अमित शहा यांच्याविरुद्ध आरोपी करण्याएवढा पुरावा आम्ही केलेल्या तपासात मिळालेला नाही,असे लेखी निवेदन सीबीआयने इशरत जहाँ प्रकरणाची सुनावणी करणार्‍या अहमदाबाद येथील विशेष न्यायालयात सादर केले आहे़

Web Title: In the last phase, BJP has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.