दिल्लीत गेल्या महिन्यात 140 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद
By Admin | Updated: February 8, 2017 17:11 IST2017-02-08T17:07:10+5:302017-02-08T17:11:00+5:30
देशाची राजधानी दिल्लीत एका महिन्यात 140 बलात्कार आणि 238 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्लीत गेल्या महिन्यात 140 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 08 - देशाची राजधानी दिल्लीत एका महिन्यात 140 बलात्कार आणि 238 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये एकूण 140 बलात्काराचे गुन्हे आणि 238 विनयभंगाचे गुन्हे दिल्ली पोलिसांनी दाखल केले आहेत. यातील 43 बलात्कार आणि 133 विनयभंगाच्या गुन्ह्यांची पोलिसांकडून उकल करण्यात आली नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
याचबरोबर दिल्लीत 2016 मध्ये एकूण 2,155 बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामधील 291 गुन्ह्यांची उकल करण्यात आली नाही. तर, 4,165 विनयभंगाच्या गुन्ह्यांपैकी 1,132 गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश मिळाले नाही, असेही हंसराज अहिर यांनी यावेळी सांगितले.