शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

'ती' सरप्राईज भेट अखेरची ठरली; शहीद कर्नल शर्मांच्या भावानं सांगितली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 12:30 IST

हंदवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना कर्नल शर्मांना वीरमरण

जयपूर: काश्मीरच्या हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल, मेजरसह दोन जवानांना वीरमरण आलं. गेल्या पाच वर्षांत प्रथमच देशानं कर्नल दर्जाचा अधिकारी गमावला. कायम युनिटला प्राधान्य देणारा अधिकारी हरपल्यानं त्यांच्या सहकाऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं. आशुतोष यांचे बंधू पियुष यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या वर्षी होळीवेळी झालेली भेट अखेरची ठरल्याचं पियुष यांनी सांगितलं.गेल्या वर्षी होळीच्या एक दिवस आधी आशुतोष कोणालाही न कळवता आला. त्याची भेट सगळ्यांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. होळी पेटवली जात असताना संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आशुतोष अचानक आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही खूप धमाल केली, अशा शब्दांत पियुष यांनी आशुतोष यांची आठवण सांगितली. आशुतोष यांची पत्नी पल्लवी आणि १२ वर्षांची मुलगी तमन्ना गेल्या अडीच वर्षांपासून जयपूरमध्ये वास्तव्यास आहेत. काश्मीरच्या हंदवाड्यात काल दहशवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. एका घरात दहशतवादी लपले असून त्यांनी स्थानिकांना ओलीस ठेवल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीर पोलिसांसह संयुक्त कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांशी दोन हात करताना कर्नल, मेजरसह दोन जवान शहीद झाले. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला वीरमरण आलं.घरी परतणाऱ्या मजुरांचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणागरीब मजूरांकडून तिकीटाचे पैसे घेऊ नका, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारला विनंती... तर लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरु, खासदार जलील यांचा इशारा

टॅग्स :Martyrशहीद