मतदारनोंदणीचा अखेरचा दिवस तोबा गर्दीचा

By admin | Published: September 18, 2014 12:35 AM2014-09-18T00:35:08+5:302014-09-18T13:17:13+5:30

बुधवारी अखेरच्या दिवशी मतदारनोंदणी करण्यास नागरिकांनी शहरातील विविध ठिकाणच्या केंद्रांवर तोबा गर्दी करीत लांबर्पयत रांगा लावल्या होत्या.

The last day of the voting turntable is crowded | मतदारनोंदणीचा अखेरचा दिवस तोबा गर्दीचा

मतदारनोंदणीचा अखेरचा दिवस तोबा गर्दीचा

Next
पिंपरी : बुधवारी अखेरच्या दिवशी मतदारनोंदणी करण्यास नागरिकांनी शहरातील विविध ठिकाणच्या केंद्रांवर तोबा गर्दी करीत लांबर्पयत रांगा लावल्या होत्या. मात्र, यामुळे कर्मचा:यांची तारांबळ उडाली होती. अपु:या कर्मचा:यांमुळे अर्ज तपासणीत अधिक वेळ जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही मतदार संघांच्या केंद्रावर आज एका दिवशी तब्बल 5 हजार 7 3क् अर्ज जमा झाले.
पुढील महिन्यात 15 तारखेस होणा:या विधानसभा निवडणुकीत मतदानाची संधी मिळावी म्हणून 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत मतदारनोंदणी मोहीम राबविली गेली. आज बुधवारी त्याचा अखेरचा दिवस होता. ही संधी साधण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू होती. सकाळपासूनच नागरिकांनी शहरातील विविध केंद्रांवर गर्दी केली होती. संबंधित कागदपत्रे घेऊन नागरिकांनी लांबर्पयत रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर गर्दी वाढत गेली. 
केंद्रावर कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने नागरिकांना अर्ज सादर करण्यास अधिक वेळ जात होता. त्यामुळे अधिक काळ रांगेत उभे राहून प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे रांग कासवगतीने पुढे सरकत 
होती. त्यात दुपारी जेवणाच्या सुटीसाठी कर्मचा:यांनी कामकाज 
बंद केले. त्यामुळे नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागले. कामकाज बंद ठेवण्यापेक्षा काही कर्मचा:यांची नेमले असते, तर नागरिकांची गैरसोय टळली असती. 
चिंचवडमधून 2 हजार 29 अर्ज
चिंचवड मतदारसंघाच्या एकूण 4 केंद्रांवर 2 हजार 29 अर्ज प्राप्त झाले. थेरगावच्या महापालिका शाळा केंद्रात 12क्क्, महापालिकेच्या मुख्य कार्यालयात 5क्क्, एका केंद्रावर 3क्क् अर्ज जमा झाले. ‘ड’ प्रभाग कार्यालयात अधिकारीच जागेवर नसल्याचे सुरक्षारक्षक सर्वाना सांगत असल्याने तेथे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. 1 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत 6,2क्4 अर्ज प्राप्त झाले, अशी माहिती निवडणूक अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली. 
भोसरीतून 2 हजार अर्ज
भोसरी मतदारसंघात आज एका दिवसात 2 हजार अर्ज प्राप्त झाले. सर्व अर्ज तपासणी करून स्वीकारण्यात आल्याने ते वैध ठरले आहेत. सायंकाळी साडेपाचर्पयत उपस्थित सर्वाचे अर्ज घेण्यात आले. नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअम केंद्रावर लांबर्पयत रांगा लागल्या होत्या. एकूण 1क् केंद्रांवर एकूण 8 हजार अर्ज जमा झाले आहेत, असे निवडणूक अधिकारी साहेबराव गायकवाड यांनी सांगितले.
पिंपरीत 1 हजार 7क्1 अर्ज
पिंपरी मतदारसंघात शेवटच्या दिवशी 1,7क्1 अर्ज मिळाले. अर्ज सायंकाळी साडेपाचर्पयत घेतले गेले. प्राधिकरणातील केशवराव हेडगेवार भवन व पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे भवन या केंद्रांवर रांगा होत्या. मोहिमेत 2 केंद्रांवर एकूण 5 हजार 455 हजार अर्ज स्वीकारण्यात आले, असे निवडणूक अधिकारी यशवंत माने यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
 
अखेरच्या दिवशी मतदारांना जाग  
नोंदणीच्या अखेरच्या दिवशी नागरिकांना जाग आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अर्ज देण्यासाठी नागरिकांची संख्या वाढत होती. आज गर्दीने विक्रमच केला. या गर्दीचा फायदा उठवीत काही कार्यकर्ते बोगस अर्ज सादर करून, बोगस मतदारनोंदणी करण्याचा प्रय} करीत होते. काही एजंट मंडळीही परिसरात दिसत होती. त्यामुळे तपासणी करूनच अर्ज घेतले जात होते. 
कागदपत्रंसाठी धावपळ 
रांगेत उभे असलेल्या नागरिकांचे अर्ज कर्मचारी तपासत होते. आवश्यक कागदपत्रे नसल्यास ते जोडण्यास सांगितले जात होते. ऐनवेळी संबंधित कागदपत्रे गोळा करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. पुन्हा घरी किंवा कार्यालयात जाऊन कागदपत्रे आणण्याची वेळ अनेकांवर आली. 
काही केंद्रावर वाद
कर्मचारी आवश्यक कागदपत्रंची सक्ती करीत होते. सायंकाळी 5 ची मुदत संपल्यानंतरही अनेक केंद्रावर आले होते. ते अर्ज घेण्यासाठी मागणी करीत होते. यावरून कर्मचा:यांशी हुज्जत घातली. अखेर केंद्रातील सर्वाचे अर्ज सायंकाळी 6.3क् र्पयत घेतले गेले. हा प्रकार थेरगाव मनपा शाळा केंद्रात घडला. 
 
लोकसभा निवडणुकीनंतर  त्वरित विशेष मोहीम 
राबवून 31 जुलैर्पयत मतदारनोंदणी करण्यात आली. या मोहिमेत अर्ज जमा करून नावनोंदणी केलेल्या मतदारांना 2क् सप्टेंबरपासून त्यांच्या संबंधित शाळेतील केंद्रावर ओळखपत्रचे वाटप केले जाणार आहे. संबंधित केंद्र वा मतदान सहायता केंद्रावरून मतदारांनी ओळखपत्र घेऊन जावीत, असे आवाहन तिन्ही मतदारसंघाच्या निवडणूक अधिका:यांनी केले आहे.
 
विधानसभेपूर्वी बुधवारी संपलेल्या मोहिमेत तिन्ही मतदारसंघांत एकूण 19 हजार 659 अर्ज प्राप्त झाले. सर्वाधिक 8 हजार अर्ज भोसरी मतदारसंघातून आले आहेत. पाठोपाठ चिंचवडमधून 6 हजार 2क्4 आणि पिंपरीतून 5 हजार 455 अर्ज जमा करण्यात आले. या अर्जामध्ये मतदारनोंदणीचे सर्वाधिक अर्ज आहेत. तसेच, नाव व पत्त्यामध्ये दुरुस्ती, मतदारसंघात बदल आदी अर्जही दाखल झाले आहेत.

 

Web Title: The last day of the voting turntable is crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.