एअर इंडियाच्या सुपर सेलचा शेवटचा दिवस, स्वस्त तिकीट १४९९ रुपयात
By Admin | Updated: May 25, 2016 16:10 IST2016-05-25T15:35:27+5:302016-05-25T16:10:07+5:30
जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यासाठी अन्य हवाई कंपन्यांप्रमाणे एअर इंडियाही आता स्वस्त तिकीट दराच्या स्पर्धेत उतरली आहे.

एअर इंडियाच्या सुपर सेलचा शेवटचा दिवस, स्वस्त तिकीट १४९९ रुपयात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यासाठी अन्य हवाई कंपन्यांप्रमाणे एअर इंडियाही आता स्वस्त तिकीट दराच्या स्पर्धेत उतरली आहे. एअर इंडियाने आणलेल्या सुपर सेल स्कीमचा आजचा शेवटचा दिवस आहे. एअर इंडियाने या स्कीमव्दारे स्वस्त हवाई प्रवासाची संधी दिली आहे.
सुपरसेलमध्ये तिकीट बुक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एअर इंडियाने देशांतर्गत हवाई प्रवासाचे तिकीट अवघ्या १४९९ रुपयात उपबद्ध करुन दिले आहे. २१ मे रोजी ही ऑफर सुरु झाली होती. सुपर सेलमध्ये तिकीट बुक करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
या दरम्यान तिकीट बुक केल्यानंतर तुम्ही एक जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रवास करु शकता. जुलै-सप्टेंबर आणि जानेवारी-मार्च या दोन तिमाहीत अन्य तिमाहींच्या तुलनेत हवाई प्रवाशांची संख्या कमी असते.
त्यामुळे या काळात जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यासाठी एअर इंडियाने सुपर सेल स्कीम आणली आहे. स्पाईस जेटने यापूर्वी अनेकवेळा स्वस्त तिकीट दराच्या योजना आणल्या आहेत.
सुपर सेलमधील तिकीट दर
मुंबई-सूरत १४९९
मुंबई-जोधपूर १८९९
मुंबई-बंगळुरु १८९९
मुंबई-दिल्ली २४९९
मुंबई-कोलकाता ३०९९