शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुढील वेळी ठोस योजनेसह या; लोन मोरेटोरियमवरून केंद्राची 'सर्वोच्च' कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 14:57 IST

दोन आठवड्यांत उत्तर द्या; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जदारांना दिलासा देण्यासाठी लोन मोरेटोरियमची सुविधा सुरू केली. यामुळे ग्राहकांना ३१ ऑगस्टपर्यंत ईएमआय भरण्यापासून दिलासा मिळाला. आता ही सुविधा संपली आहे. मोरेटोरियम सुविधेला मुदतवाढ देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज न्यायालयानं यावरून केंद्र सरकारची कानउघाडणी केली. दोन आठवड्यांत उत्तर द्या आणि ठोस योजना सादर करा, अशा शब्दांत न्यायालयानं सरकारचे कान टोचले आहेत.लोन मोरेटोरियम सुविधा संपल्यानंतर आता कर्जदारांना बँकांकडून ईएमआयसाठी मेसेज, फोन कॉल्स आणि ई-मेल्स येण्यास सांगितलं आहे. कोरोना काळात अनेक कर्जदारांना पगार कपातीचा सामना करावा लागल्यानं कर्जाचा हफ्ता भरणं अवघड झालंय आहे. ईएमआय न भरल्यास बँकांकडून कर्ज खातं एनपीए म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जदारांची चिंता वाढली आहे.लोन मोरेटोरियमवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्राची कानउघाडणी केली. 'सरकारनं आतापर्यंत कोणतीही ठोस योजना सांगितलेली नाही. ३१ ऑगस्टपर्यंत कर्ज फेडू शकणाऱ्यांची खाती एनपीए म्हणून जाहीर करू नये, असा आदेश आम्ही दिला होता. केंद्र सरकार जोपर्यंत ठोस योजना सादर करत नाही, तोपर्यंत एनपीए संदर्भात दिलेला अंतरिम आदेश कायम राहील,' असं न्यायालयानं म्हटलं. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय