शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

दिलासादायक! १०७४ जण कोरोनामुक्त; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २८ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 14:11 IST

coronaVirus Latest Marathi News: कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बाब समोर आली आहे. 

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 42 हजार 533 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 1300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (4 मे) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक बाब समोर आली आहे. 

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनूसार, गेल्या 24 तासात देशभरात 2,553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच 1074 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यामुळे आता बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 27.52 टक्के असल्याचे लव अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक भागांत नागरिकांना काही सूट देण्यात आली असली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याची जबाबदारी आता नागरिकांवर आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणं टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केलं आहे.

दररोज १ लाख चाचण्या

भारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे फक्त 694 लोकांचीच कोरोना चाचणी होत आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत लाखो लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. देशात दररोज 1 लाख लोकांची चाचणी करण्याचे लक्ष्य आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या