गुरुग्राममध्ये हाफिजच्या पैशातून खरेदी केलेला बंगला ईडीकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 09:01 AM2019-03-12T09:01:41+5:302019-03-12T09:05:12+5:30

लष्कर-ए-तोयब्बाचा म्होरक्या,  26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे.

lashkar e taiba chief hafiz saeed villa seize in gurugram | गुरुग्राममध्ये हाफिजच्या पैशातून खरेदी केलेला बंगला ईडीकडून जप्त

गुरुग्राममध्ये हाफिजच्या पैशातून खरेदी केलेला बंगला ईडीकडून जप्त

Next

नवी दिल्ली- लष्कर-ए-तोयब्बाचा म्होरक्या,  26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. काश्मिरी व्यावयासिक जहूर अहमद शाह वटाली याच्या नावे ही मालमत्ता असून, त्या बंगल्याची किंमत अंदाजे 1 कोटींहून अधिक आहे. उद्योजक जहूर अहमद शाह वटाली हा लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदच्या पैशांचे सर्व व्यवहार सांभाळतो. काश्मिरी व्यावयासिक जहूर अहमद शाह वटालीची ही मालमत्ता गुरुग्राममध्ये आहे. या मालमत्तेची किंमत 1 कोटी तीन लाख रुपये सांगितली जात आहे.

एनआयएनं दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपात 2017मध्ये वटालीसह 18 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे.  ईडीच्या माहितीनुसार, या बंगल्याच्या खरेदीसाठी फलाह-ए- इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेचा पैसा वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा पैसा संयुक्त अरब अमिरातीतून हवालामार्गे भारतात आल्याचे तपासात उघड झालं आहे.

हाफिज सईदने बनावट नावांचा वापर करून वटालीकरवी भारतात तब्बल 24 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडी जमा करत आहे. 

Web Title: lashkar e taiba chief hafiz saeed villa seize in gurugram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.