शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशात ठिकठिकाणी आगीचा भडका; नासाचा 'हा' फोटो धक्कादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 16:47 IST

मध्य भारतातल्या आगीचं निशाण हे वणव्यांमुळे नव्हे, तर पिकं कापून झाल्यानंतर उरलेल्या तणाला लावलेल्या आगींमुळे दिसत आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं गेल्या 10 दिवसांतील अवकाशातील फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्या फोटोंमध्ये भारतातल्या अनेक भागात आग लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह दक्षिणेकडच्या अनेक राज्यांमध्ये अशी आग लागल्याचं दिसत आहे. उन्हाळ्याचा दिवसांत वातावरणात कमालीचा उकाडा जाणवतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असून, कार्बनही उत्सर्जित होतोय.भारतातल्या मोठ्या भागात दिसत असलेली आग ही जंगलात लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. परंतु नासाचे संशोधक हिरेन जेठवा यांच्या मते, मध्य भारतातल्या आगीचं निशाण हे वणव्यांमुळे नव्हे, तर पिकं कापून झाल्यानंतर उरलेल्या तणाला लावलेल्या आगींमुळे दिसत आहे. शेतकरी आता मशिननं पिकं कापत असल्यानं तण राहतात. जमीन पुन्हा सपाट करण्यासाठी हे तण जाळण्यात येतात. हे तण काढणं सोपं नसतं म्हणूनच ते जाळण्याचा पर्याय शेतकरी सर्रास वापरतात. हरियाणा आणि पंजाब ही राज्यांचं नव्हे, तर भारतातील अनेक राज्यांत अशा प्रकारे तण जाळली जातात. भात कापून झाल्यानंतर राहिलेली तण ब-याचदा गुरं खातात. ते गुरांच्या आरोग्यासाठी नुकसानकारक असल्यानंही ती जाळण्यात येतात. परंतु सध्या गव्हाच्या पिकांची कापणी झाल्यानंतर राहिलेलं तण जाळण्याचाही प्रकार जोर धरतोय.नासाच्या सेटलाइटद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रात ज्या भागात आगीचे निशाण दिसत आहेत. त्यात गहू आणि भातशेतीचा समावेश आहे. पिकांना कापण्याचे दोन प्रकार प्रचलित आहे. एक तर शेतकरी स्वतः पिकं कापतात, तर दुस-या प्रकारात शेतकरी मशिनचा वापर करतात. परंतु मजुरांच्या कमतरतेमुळे सध्या तरी शेतकरी मशिनच्या वापराला जास्त प्राधान्य देतात. पिकांचं तण जाळण्याच्या विषयावर अध्ययन करणा-या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस रिसर्चर रिधिमा गुप्ता म्हणाल्या, देशात मशिननं पिकांच्या कापणीला प्राधान्य दिलं जातंय. शेतक-यांना हातानं तण कापण्यापेक्षा आगीनं जाळून नष्ट करणं सोपं जातं. मजुरांकडून कापून घेणं हे मशिननं कापणी करण्यापेक्षा महागडं आहे. पिकांचे तण जाळल्यामुळे कार्बनचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होतं. या आगीत मध्य प्रदेशमधल्या सिहोर जिल्ह्यातील जास्त चित्र आहेत. 

टॅग्स :NASAनासा