महापुरामुळे सफरचंदचे मोठे नुकसान
By Admin | Updated: September 21, 2014 01:13 IST2014-09-21T01:13:57+5:302014-09-21T01:13:57+5:30
जम्मू-काश्मिरात गत अनेक दशकांतील सर्वाधिक भीषण महापुराने राज्यातील बागायती शेतीला जोरदार फटका बसला आह़े

महापुरामुळे सफरचंदचे मोठे नुकसान
जम्मू : जम्मू-काश्मिरात गत अनेक दशकांतील सर्वाधिक भीषण महापुराने राज्यातील बागायती शेतीला जोरदार फटका बसला आह़े राज्यातील सुमारे एक हजार कोटी रुपयांचे सफरचंदाचे पीक यामुळे नष्ट झाले आह़े एसोचॅम या वाणिज्य मंडळाने केलेल्या पाहणीतून नुकसानीचा हा आकडा समोर आला आह़े
एसोचॅमने जारी केलेल्या अहवालानुसार, पुरामुळे काश्मिरातील सुमारे एक हजार कोटी रुपयांचे सफरचंदाचे पीक वाहून गेल़े यामुळे काश्मिरी शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले आह़े ग्राहकांवरही याचा प्रभाव शक्य असून आगामी सणासुदीच्या काळात सफरचंद महाग होऊ शकतात़ पुरामुळे सर्वाधिक प्रभावित बारामुल्ला, कुपवाडा आणि सोपोर येथे सफरचंदाचे सर्वाधिक उत्पन्न होत़े याच तीन जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली आह़े सफरचंद हे काश्मिरी अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आह़े याची वार्षिक उलाढाल 12क्क् कोटी रुपयांच्या घरात आह़े
दरवर्षी काश्मिरात सुमारे 16 लाख टन सफरचंदाचे उत्पन्न होत़े सुमारे 3क् लाख लोक या उद्योगाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणो जुळलेले आहेत़ (वृत्तसंस्था)
च्पुरामुळे राज्यातील 1276 सरकारी शाळा इमारतींचेही नुकसान झाले आह़े 2क्क् शाळा अक्षरश: वाहून गेल्या आहेत तर उर्वरित हजार शाळा इमारतींचे काही प्रमाणात नुकसान झाले आह़े या इमारतींची लवकरात लवकर दुरुस्ती आणि त्यातील पायाभूत सुविधा सुरळीत करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आह़े या दुरुस्ती व पुनर्बाधणी कामांसाठी प्रशासनाने 62 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आह़े