शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 22:09 IST

डीएमके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन यांनी या अपघाताचा संबंध भाषेशी जोडला आहे...

तामिळनाडूतील कडलूर जिल्ह्यात सेम्मनगुप्पम येथे मंगळवारी (8 जुलै 2025) एक स्कूल व्हॅन आणि ट्रेनचा अपघात झाला. या अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दक्षिण रेल्वेने या दुःखद घटनेची माफी मागत रेल्वे फाटकावर तैनात गेटकीपरला निलंबित केले आहे. यानंतर, त्याला अटकही करण्यात आली. दरम्यान, डीएमके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन यांनी या अपघाताचा संबंध भाषेशी जोडला आहे.

"ड्युटीवर तैनात कर्मचाऱ्याला तमिळ येत नव्हतं" -यासंदर्भात बोलताना द्रमुक प्रवक्ते टीकेएस एलांगोवन म्हणाले, "या ठिकाणी यापूर्वीही एक अपघात झाला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वतः म्हटले होते की ड्युटीवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्याला तमिळ भाषा येत नसल्याने हे घडले. त्याला दिलेला आदेश तो समजू शकला नाव्हता. आता झालेल्या अपघातातही असेच घडले आहे. अशा महत्त्वाच्या पदांवर स्थानिक भाषा जाणणाऱ्या लोकांनाच नियुक्त करणे केव्हाही चांगले. हेच उपयुक्त ठरेल. यामुळे किमान जीव तरी वाचतील." 

धावत्या ट्रेनची धडक -यासंदर्भात रेल्वे विभागाने म्हटले आहे की, "सकाळी ७:४५ च्या सुमारास, विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन कुडलूर आणि अलप्पक्कम दरम्यान रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक १७० ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. याच वेळी, तिला ट्रेन क्रमांक ५६८१३ विल्लुपुरम-मयिलादुथुराई पॅसेंजर ट्रेनची धडक झाली." पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन धडकेनंतर रेल्वे क्रॉसिंगपासून काही अंतरावर पडली. यानंतर लोको पायलटने काही अंतरावर ट्रेनही थांबवली होती.

पीटीआयच्या वृत्तानुसार, रेल्वेने म्हटले आहे की, "शाळेत पोहोचण्यास उशीर होऊ नये म्हणून व्हॅन चालकानेच गेट ओलांडण्याची परवानगी मागितली होती आणि गेटकीपरने नियम आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन करत त्याला गेट ओलांडण्याची परवानगी दिली. गेटकीपरने नियमांनुसार गेट उघडायला नको होते. याप्रकरणी गेटकीपरला निलंबित करण्यात आले आहे आणि त्याला सेवेतून काढून टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे." 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूTrain Accidentरेल्वे अपघातSchoolशाळाStudentविद्यार्थीPoliticsराजकारणIndian Railwayभारतीय रेल्वे