शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

बापरे! एका मिनिटाला मोजावे लागतात 50 रुपये; मोबाईल सेवा बंद असल्याने नागरिक झाले त्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 9:47 AM

काश्मीर खोऱ्यात मागील 51 दिवसांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे

श्रीनगर - तंगमर्गमधील जहूर अहमद मीर मागील शुक्रवारी 38 किमीचा पल्ला पार करत एका मित्राच्या कार्यालयात श्रीनगर येथे पोहचले. अहमद मीर यांना त्यांच्या मुलाला कॉल करायचा होता. तो जम्मूतील एका खाजगी कंपनीत कार्यरत आहे. जहूर यांना एक फोन कॉल करण्यासाठी इतक्या लांब जाण्याची गरज यासाठी पडली कारण पट्टन येथील एका दुकानदाराने त्यांचा लँडलाइन वापरण्यासाठी एका मिनिटाला 50 रुपयांची मागणी केली, हे ऐकून त्यांना धक्का बसला. 

काश्मीर खोऱ्यात मागील 51 दिवसांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. मोबाईल नेटवर्क बंद असल्याने लँडलाइनचा वापर करावा लागतो. अशातच ज्यांच्याकडे लँडलाइन आहे ते पैसे कमाविण्याची संधी सोडत नाही. अनेक ठिकाणी पीसीओ उघडण्यात आले आहेत. सामान्य लोकांकडून पैसे लुटण्याचे प्रकार सर्रासपणे होताना पाहायला मिळत आहे. बारामुल्लामधील पलहल्लन गावात राहणारे गुलाम हसन डार यांना बंगळुरुत आपल्या मुलाशी बोलण्यासाठी एका मिनिटाला 30 रुपये द्यावे लागले. त्यांनी सांगितले की, एक आठवडा झाला तरी त्यांचा मुलगा मुख्तारसोबत बोलणं होऊ शकलं नाही. याच कारण आहे की, मुलाचा आवाज ऐकण्यासाठी वडिलांना किंमत मोजावी लागते. 

श्रीनगर येथील रैनावरीत राहणारे सईद अफजल नेहमी लाल चौकातील त्यांच्या मित्राच्या कार्यालयात जातात. त्यांची मुलगी शबाना आणि नातिनो या दिल्लीत वास्तव्य करतात. अफजल यांनी सांगितले की, मी माझा छोटा मुलगा अफरोजसोबत गेल्या 6 आठवड्यापासून बोललो नाही. तो दुबईत राहायला आहे. मोबाईल सेवा कधी सुरु होईल अन् जनजीवन सर्वसामान्य होईल याकडेच काश्मीर खोऱ्योतील लोकांचे लक्ष आहे. फोन कॉलच्या बदल्यात जास्त किंमत वसूल करण्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त आहेत.  जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविल्यानंतर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून काश्मीर खोऱ्यात मोबाईल सेवा, इंटरनेट यांच्यावर निर्बंध आणले आहेत. तसेच माध्यमांनाही जम्मू काश्मीरात वृत्तांकन करण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात अनेक स्थानिक माध्यमांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. काश्मीरमधील लोकांचा आवाज दाबला जातोय असा आरोप विरोधकांकडून सुरु आहे. कलम 144 लागू असल्याने अनेक ठिकाणी भारतीय जवान तैनात आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370