शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
2
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
3
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
4
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
5
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
6
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
7
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
8
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
9
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
10
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
11
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
12
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
13
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
14
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
15
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
16
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
17
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
18
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
19
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
20
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
Daily Top 2Weekly Top 5

मृत हिंदूंच्या नावावर जमीन, बोगस व्यवहार; अल-फलाह विद्यापीठाच्या जवाद अहमद सिद्दीकींबाबत EDचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 15:40 IST

मृत हिंदू जमीनमालकांच्या नावावर बोगस कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन हडपल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दिल्लीतील मदनपूर खादर येथील मृत हिंदू जमीनमालकांच्या नावावर बोगस कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांची जमीन हडपल्याचा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईडीने केलेल्या तपासामध्ये अल-फलाह विद्यापीठाचे चेअरमन जवाद अहमद सिद्दीकी यांच्याशी संबंधित एका फाउंडेशनचा या महाघोटाळ्यात थेट सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात जमीन खरेदी-विक्रीचा संपूर्ण व्यवहार फसवणूक आणि बनावटगिरीवर आधारित असून, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो बोगस असल्याचे ईडीच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

मृतांच्या सहीने झाली जमीन विक्री!

ईडीच्या तपासानुसार, मदनपूर खादर येथील खसरा क्रमांक ७९२ ची जमीन बोगस कागदपत्रांच्या आधारे 'तर्बिया एज्युकेशन फाउंडेशन'च्या नावावर करण्यात आली. हे फाउंडेशन थेट जवाद अहमद सिद्दीकी यांच्याशी जोडलेले आहे. सर्वात मोठा खुलासा म्हणजे, ही जमीन विकण्यासाठी वापरण्यात आलेली जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी पूर्णपणे बनावट होती.

जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये सह्या किंवा अंगठ्याचे ठसे दाखवले आहेत, त्यापैकी नथ्थू (मृत्यू १९७२), हरबंस सिंग (मृत्यू १९९१), हरकेश (मृत्यू १९९३), शिव दयाल (मृत्यू १९९८) आणि जय राम (मृत्यू १९९८) यांसारखे अनेकजण १९७२ ते १९९८ दरम्यानच मरण पावले होते. या सर्वांच्या मृत्यूनंतरही ७ जानेवारी २००४ या दिवशी ही जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी तयार केल्याचे दाखवण्यात आले आणि मृत व्यक्तींनी स्वतः जमिनीच्या विक्रीची परवानगी दिली, असे कागदपत्रांत नमूद करण्यात आले.

खोट्या सह्या, स्वस्तात जमीन बळकावली!

या बनावट जनरल पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने पुढे जमिनीची विक्री केली. जमिनीच्या मूळ मालकांमध्ये मृत व्यक्तींचाही समावेश होता, पण कागदपत्रात त्यांना सह-मालक दाखवून त्यांचा हिस्साही विकण्यात आला. ९ वर्षांनंतर, २७ जून २०१३ रोजी एक नोंदणीकृत विक्रीपत्र तयार करण्यात आले. या विक्रीपत्रात जमिनीची किंमत ७५ लाख रुपये दाखवण्यात आली, तर त्या वेळी तिची खरी किंमत सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये होती. तर्बिया एज्युकेशन फाउंडेशन हे खरेदीदार म्हणून दाखवले गेले, तर विनोद कुमारने सर्व मालकांच्या वतीने सह्या केल्या. यात मृत व्यक्तींचा हिस्साही बेकायदेशीररित्या विकला गेला.

न्यायालयात धाव घेतलेल्या कुटुंबाचा आरोप

जमीनमालक कुलदीप बिधूडी यांनी सांगितले की, त्यांच्या खानदानाची जमीन फसवणूक करून विकली गेली. त्यांनी खटला दाखल केल्यानंतर कोर्टाच्या आदेशावरून बांधलेले बांधकाम पाडण्यात आले. तसेच, मालकी हक्क सांगणारे भगत सिंग बिधूडी यांचा आरोप आहे की, त्यांच्या हिश्शाच्या १६०० गज जमिनीवर बनावट सह्या करून ती विकली गेली.

ईडीने स्पष्ट केले आहे की, मृत व्यक्तींच्या नावावर केलेली जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी कायदेशीररित्या अमान्य असते आणि त्यावर आधारित कोणताही व्यवहार बेकायदेशीर असतो. ईडी आता या महाघोटाळ्यातील बनावट कागदपत्रे तयार करणारे, दलाल, विक्रीपत्र करणारे आणि या व्यवहाराचा फायदा घेणाऱ्या सर्वांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या आरोपाखाली कारवाई करत आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटterroristदहशतवादी