लोकसभेत भूसंपादन विधेयक मंजूर
By Admin | Updated: March 10, 2015 20:27 IST2015-03-10T20:12:03+5:302015-03-10T20:27:27+5:30
मोदी सरकारचे महत्त्वाकांक्षी भूसंपादन विधेयक ९ सुधारणांसह लोकसभेत मंजुर करण्यात आले असून काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मतदानादरम्यान सभात्याग करत आपला विरोध दर्शवला.
लोकसभेत भूसंपादन विधेयक मंजूर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - मोदी सरकारचे महत्त्वाकांक्षी भूसंपादन विधेयक ९ सुधारणांसह लोकसभेत मंजुर करण्यात आले असून काँग्रेस व तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मतदानादरम्यान सभात्याग करत आपला विरोध दर्शवला. तर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही मतदानादरम्यान तटस्थ राहून आपला विरोध दर्शवला आहे.
मोदी सरकारसाठी भूसंपादन विधेयक अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. शिवसेनेसह मित्रपक्षानेही मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकावर आक्षेप घेतला होता. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप विरोधकांसह एनडीएतील मित्रपक्षांनीही केला होता. मंगळवारी मोदी सरकारने ११ सुधारणांसह हे विधेयक लोकसभेत सादर केले. लोकसभेतील बहुमतामुळे हे विधेयक सहज मंजूर झाले. लोकसभेतील पहिल्या परीक्षेत मोदी सरकार पास झाले आहे. आता खरी कसोटी राज्यसभेत लागणार आहे. राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसून राष्ट्रवादी, शिवसेनेसह अन्य सर्व पक्ष विधेयकाच्या विरोधात आहेत. त्यामुळे राज्यसभेत हे विधेयक मंजूर करवून घेताना मोदी सरकारची कसोटी लागणार ऐवढे मात्र नक्की.