शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लान्सनायक हनुमंतअप्पा शहीद, दिल्लीतील रुग्णालयात झाले निधन

By admin | Updated: February 11, 2016 15:00 IST

सियाचीनमधील उणे ४५ अंश तापमानात ३५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले लान्सनायक हनुमंतअप्पा यांचे दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - सियाचीनमधील उणे ४५ अंश तापमानात ३५ फूट बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आणि ६ दिवसांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आलेले लान्सनायक हनुमंतअप्पा यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. दिल्लीतील लष्करी रुग्णालयात गुरूवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले. 
गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून कोमात असलेल्या हनुमंतअप्पा यांची प्रकृती ढासळतच गेली, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली होती. हनुमंतअप्पा हे असामान्य जवान असून त्यांनी दुर्दम्य धैर्य आणि संयमाचे दर्शन घडविले आहे, या शब्दांत मोदींनी प्रशंसा केली.
पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेजवळ १९,६०० फूट उंचीवरील लष्करी चौकीवर २ फेब्रुवारी रोजी हिमकडा कोसळल्यामुळे १० जवान बर्फाखाली गाडले गेले होते. हे सर्व जवान शहीद झाल्याची भीती लष्कराने वर्तवली होती. हाडे गोठवणाऱ्या थंडीत अतिशय प्रतिकूल वातावरण असताना लष्कराच्या शोधपथकाने सहा दिवसांपासून रात्रंदिवस अथक शोधमोहीम चालवली असता सोमवारी रात्री उशीरा बर्फ कापल्यानंतर त्या पथकाला हनुमंतअप्पांच्या हालचाली आढळून आल्या. त्यांना लगेच एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र सहा दिवस उणे ४५ अंश तापमानात बर्फाखाली गाडलेल्या अवस्थेत राहिल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने ते कोमात गेले होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती आणखीनच खालावत गेली. काल रुग्णालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार हनुमंतअप्पा यांची किडनी व यकृत काम करत नसून त्यांचा रक्तदाब वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. तसेच त्यांच्या मेंदुला ऑक्सिजन पुरवठाही नीट होत नव्हता आणि या सर्वात कहर म्हणजे त्यांना न्युमोनियाही झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आज सकाळी हनुमंतअप्पा यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने डॉक्टरांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि सकाळी पावणेबाराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 
 
महिलेने देऊ केली किडनी
हनुमंतअप्पा यांच्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करीत असताना उत्तर प्रदेशातील एका गृहिणीने या शूर जवानास आपली एक किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. निधी पांडे असे या महिलेचे नाव असून ती येथून उत्तर प्रदेशची रहिवासी आहे. हनुमंतअप्पांची प्रकृती चिंताजनक असल्याचे तसेच त्यांची किडनी व अन्य अवयव नीट काम करीत नसल्याचे वृत्त निधी यांनी टीव्हीवर पाहिले. देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या या शूर जवानासाठी प्रार्थना नाही तर त्यापेक्षा काहीतरी ठोस केले पाहिजे, असे निधी यांना त्याक्षणाला वाटले. यानंतर निधी यांनी हेल्पलाईनवर फोन करून हनुमंतअप्पा यांच्यासाठी स्वत:ची किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आज त्यांचे निधन झाल्याने सर्व देशावर शोककळा पसरली आहे. 
 
 
दिग्गजांनी वाहिली हनुमंतअप्पांना श्रद्धांजली
लान्सनायक हनुमंतअप्पा कोपड यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शहा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.