कुलूप तोडून १.९४ लाखाचा मुद्देमाल लंपास
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:34+5:302015-02-11T00:33:34+5:30
कुलूप तोडून १.९४ लाखाचा मुद्देमाल लंपास

कुलूप तोडून १.९४ लाखाचा मुद्देमाल लंपास
क लूप तोडून १.९४ लाखाचा मुद्देमाल लंपासनागपूर : घराला कुलूप लावून बाहेर गेलेल्या महिलेच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख असा एकूण १.९४ लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी २ ते रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान मोमीनपुरा पोलीस चौकीसमोरील बकरा मंडीजवळ घडली. शाहिना परविन इस्लाम कुरेशी (४०) रा. मोमिनपुरा पोलीस चौकीजवळ, बकरा मंडी या आपल्या घराला कुलुप लावून बाहेर गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी आलमारीतील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख ४० हजार असा एकूण १.९४ लाखाचा मुद्देमाल लंपास केला. ...........