कारची काच फोडून ९१ हजाराचा मुद्देमाल लंपास
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:08+5:302015-02-20T01:10:08+5:30
कारची काच फोडून ९१ हजाराचा मुद्देमाल लंपास

कारची काच फोडून ९१ हजाराचा मुद्देमाल लंपास
क रची काच फोडून ९१ हजाराचा मुद्देमाल लंपासनागपूर : कार्यालयासमोर उभ्या केलेल्या कारची काच फोडून कारमधील ९१ हजाराचा मुद्देमाल बुधवारी सकाळी ११.४५ ते दुपारी २ दरम्यान चोरून नेल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुभाष विठ्ठलराव कुळकर्णी (५२) रा. बुटी ले आऊट, लक्ष्मीनगर हे अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माधवनगरमधील राज एजन्सीच्या कार्यालयासमोर आपली विन्टो कार उभी करून कार्यालयात गेले. अज्ञात आरोपीने त्यांच्या कारच्या मागील उजव्या बाजूच्या खिडकीची काच फोडून कारमधील आयपॅड किंमत ४० हजार, रोख ५१ हजार आणि कागदपत्र असा एकूण ९१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.