शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लालू प्रसाद यादव यांनी या नेत्याची भेट घेतल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ, समिकरणं बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 20:27 IST

Bihar Politics News: बिहारच्या राजकारणामध्ये चढउतार येतच असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी सुरू केलेल्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

राजकारणामध्ये  कुणी कुणाचा मित्र आणि शत्रू नसतो, असं म्हटलं जातं. कोण कधी कुणासोबत आघाडी करेल आणि कोण कधी आपली युती मोडेल हे सांगता येत नाही. बिहारच्या राजकारणामध्ये तर असे चढउतार येतच असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी सुरू केलेल्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी दिवंगत मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या पत्नी हिना शहाब यांची भेट घेतली. या तिघांचीही भेट पाटणा येथील बोरिंग रोड येथील आरजेडीच्या एका आमदाराच्या घरी झाली. अचानक झालेल्या या भेटीमुळे बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.  

सुमारे तासभर चाललेल्या या भेटीमध्ये तिन्ही नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या निधनानंतर लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि हिना शहाब यांच्यात झालेली ही पहिलीच मोठी बैठक आहे. शहाबुद्दीन कुटुंबीय आणि लालू प्रसाद यादव यांच्यात बिघडलेल्या संबंधांना पुन्हा दुरुस्त करण्यासाठीचं पाऊल म्हणून या भेटीकडे पाहिलं जात आहे.  

आरजेडीकडून हिना शहाब यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिना शहाब यांनी सिवान येथून अपक्ष निवडणूक लढवली होती. तसेच त्या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. दरम्यान, लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासोबत त्यांची सकारात्मक वातावरणात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आता हिना शहाब पुन्हा एकदा आरजेडीमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच येणाऱ्या काळात हिना शहाब यांचा मुलगा ओसामा शहाब हा किंवा त्यांचा सून सिवानमधील रघुनाथपूर विधानसभा मतदारसंघातून आरजेडीकडून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय हिना शहाब यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल, असा दावाही केला जात आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलBiharबिहार