शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

Lalu Prasad Yadav: चारा घोटाळा! लालू यादवांना जामीन मिळणार की तुरुंगात जाणार, आज महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 09:28 IST

Fodder Scam Update: चारा घोटाळा प्रकरणात आज सीबीआयचे विशेष न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे.

पाटणा: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि RJD सुप्रीमो लालू प्रसाद यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह एकूण 110 आरोपी आहेत. 

23 वर्षे जुने प्रकरणचारा घोटाळ्याशी संबंधित या प्रकरणात 29 जानेवारी रोजी बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण केल्यानंतर, सीबीआय विशेष न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सुमारे 23 वर्षे जुने हे प्रकरण 1990 ते 1995 दरम्यान झारखंडच्या डोरंडा येथे असलेल्या ट्रेझरीमधून 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्याबाबतचे आहे.

लालू प्रसाद चार प्रकरणात दोषीया खटल्यात 7 ऑगस्ट 2021 रोजी फिर्यादी पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला, ज्यामध्ये एकूण 575 साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले. तर बचाव पक्षाच्या वतीने 29 जानेवारी रोजी 110 आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाला. लालू प्रसाद यांचाही यात समावेश आहे. बचाव पक्षाचे वकील संजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार, लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या 4 प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. यात चाईबासा कोषागारातून बेकायदेशीर पैसे काढण्याचे दोन प्रकरण आहेत, तर लालू प्रसाद यांना देवघर आणि दुमका कोषागार प्रकरणात जामीन मिळाला आहे.

आजच्या निर्णयावर सर्वांची नजरमात्र, आता केवळ दोरांडा प्रकरणात निर्णय येणे बाकी आहे. दुमका प्रकरणात उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर लालू सध्या तुरुंगाबाहेर आहेत. मात्र, मंगळवारी ते दोरांडा ट्रेझरी प्रकरणातील निर्णयासंदर्भात रांचीला पोहोचले आहेत. आता मंगळवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाने लालूंच्या अडचणी वाढणार का कमी होणार, हे पाहावे लागेल.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवFodder scamचारा घोटाळाCBIगुन्हा अन्वेषण विभागCourtन्यायालय