प्रचारसभेत लालूप्रसाद थोडक्यात बचावले

By Admin | Updated: October 16, 2015 22:49 IST2015-10-16T22:49:28+5:302015-10-16T22:49:28+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे(राजद)सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव शुक्रवारी एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. मोतीहारीच्या लखौरा येथे निवडणूक प्रचारासाठी पोहोचलेल्या लालूप्रसाद

Lalu Prasad escaped briefly in the public meeting | प्रचारसभेत लालूप्रसाद थोडक्यात बचावले

प्रचारसभेत लालूप्रसाद थोडक्यात बचावले

मोतीहारी : राष्ट्रीय जनता दलाचे(राजद)सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव शुक्रवारी एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. मोतीहारीच्या लखौरा येथे निवडणूक प्रचारासाठी पोहोचलेल्या लालूप्रसाद यांच्यावर सभा मंडपातील सिलिंग फॅन अचानक कोसळला. या दुर्घटनेत ते किरकोळ जखमी झाले.
प्रचारसभेत एका नेत्याचे भाषण सुरू असताना लालू व अन्य नेते मंचावर बसलेले होते. यादरम्यान लालूप्रसाद चहा पीत असतानाच अचानक सिलिंग फॅन कोसळला. या फॅनचा एक कोपरा लालूप्रसाद यांच्या हाताला लागला. यामुळे त्यांच्या हातातील कपही निसटला. या दुर्घटनेनंतर मंचावर एकच गोंधळ उडाला. लालूप्रसादांचाही पारा क्षणभर चढला. सभा मंडपाचे काम पाहणाऱ्यांसोबतच पोलिसांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. अर्थात काही क्षणातच वातावरण निवळले आणि लालूप्रसाद काहीच झाले नसल्याच्या अविर्भावात भाषणासाठी उभे झाले. यावेळी आपल्या गळ्यातील दुर्गामातेचे लॉकेट दाखवत, ज्याच्यावर मातेची कृपादृष्टी आहे त्याचे कुणी काहीही बिघडवू शकत नाही, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे लालूप्रसाद पंख्याकडे बोट दाखवून त्याच्या अवस्थेविषयी बोलत असतानाच ही दुर्घटना घडली. (वृत्तसंस्था)

Web Title: Lalu Prasad escaped briefly in the public meeting