एवढंही हसवू नका !, लालूंनी उडवली मोदींच्या भाषणाची खिल्ली
By Admin | Updated: February 17, 2017 12:56 IST2017-02-17T12:52:16+5:302017-02-17T12:56:30+5:30
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवणारे ट्विट केले आहे.

एवढंही हसवू नका !, लालूंनी उडवली मोदींच्या भाषणाची खिल्ली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवणारे ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील भाषणात स्वतःला 'उत्तर प्रदेशचा दत्तक पुत्र' असे म्हटले होते. लालू यांनी याचाच ट्विटरमध्ये उल्लेख करत 'पंजाब में खून का बेटा और उत्तर प्रदेश में दत्तक पुत्र! गजब है रे भाई..इतना मत हंसाओ!", असे सांगत पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा टार्गेट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशातील हरदोई येथील प्रचारसभेला संबोधित करताना म्हटले की, 'भगवान श्रीकृष्ण यांची उत्तर प्रदेश ही जन्मभूमी तर गुजरात कर्मभूमी. मी गुजरातमध्ये जन्मलो आणि उत्तर प्रदेशनं मला दत्तक घेतले. ही माझी कर्मभूमी आहे. उत्तर प्रदेशला सोडेन, असा मी मुलगा नाही.
दत्तक मुलगाही आई-वडिलांची काळजी घेणार आणि येथील परिस्थिती बदलण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडणार. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. बहुमत देऊन उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन करा, असे आवाहनही यावेळी त्यांनी जनतेला केले. पंतप्रधानांच्या याच विधानांवरुन कोपरखळी घेत, 'आता एवढंही हसवू नका !', असे ट्विट करत लालूंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव ट्विटरवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे.
पंजाब में खून का बेटा और यूपी में दत्तक पुत्र!
गज़ब है रे भाई....इतना मत हँसाओ!