शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

लालूप्रसाद यादव मीडियाचे डार्लिंग- नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 20:38 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.

पटणा, दि. 4 -  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना टीकात्मकरीत्या मीडियाचे डार्लिंग असं संबोधलं आहे. ते म्हणाले, मीडियात कायम चर्चेत राहण्यासाठी लालूप्रसाद यादव वेगवेगळ्या पद्धतीनं भाषणबाजी करतात. केंद्रीय मंत्रिमंडळात जनता दल युनायटेडला सहभागी होण्याची इच्छा आणि अपेक्षा नव्हती.पटणामधील एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होण्याची कोणतीही इच्छा आणि आकांक्षा नव्हती. मात्र यावर काही लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा करत आहेत. मीडियामध्ये या सर्व विषयांची चर्चा झाली. त्यावेळी तुमच्यासाठी डार्लिंग असणा-या लोकांनासुद्धा बोलण्याची संधी मिळाली. मीडियाचे डार्लिंग असलेल्या लालूप्रसाद यादव यांची विधानं कोणीही गांभीर्यानं घेत नाही. लालूप्रसाद यादव यांना जे बरळायचं आहे ते त्यांनी बरळत राहावं. आम्ही बिहारची जनता, बिहारचे हित आणि विकासासाठी कटिबद्ध आहोत. केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूची कोणतीही उपेक्षा करण्यात आलेली नाही. मीडियानं यावर जास्त चर्वितचर्वण करू नये, असंही नितीश कुमार म्हणाले आहेत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला मोठी गर्दी उसळली होती. संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आदींनी या रॅलीला हजेरी लावली होती.राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, 2019च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाचा पराभव करू आणि त्यासाठी विरोधकांच्या एकीचे दर्शन या रॅलीतून दिसेल. जदयूचे बंडखोर नेते शरद यादव यांचे लालूप्रसाद यादव यांनी व्यासपीठावर गळाभेट घेऊन स्वागत केले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करुन शरद यादव या रॅलीत सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. जदयूचे राज्यसभा सदस्य अली अनवर हेही या रॅलीला उपस्थित होते. जदयूचे नेते के. सी. त्यागी यांनी शरद यादव यांना पाठविलेल्या पत्रात रॅलीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शरद यादव यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्यास असे समजण्यात येईल की, त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार पक्ष सोडला आहे.

आणखी वाचाबिहारमध्ये याआधी आलेली पूरस्थिती मोदींना महत्त्वाची वाटली नाही- लालू प्रसाद यादव

तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे स्वागत राबडी देवी यांनी केले. व्यासपीठावर भाकपचे महासचिव एस. सुधाकर रेड्डी आणि सचिव डी. राजा यांची उपस्थिती होती. झामुमोचे प्रमुख आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, झाविमोचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी, राष्ट्रवादीचे नेते व संसद सदस्य तारिक अन्वर यांचीही उपस्थिती होती.  या वेळी रघुवंश प्रसाद सिंह, अब्दुल बारी सिद्दीकी, शिवानंद तिवारी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी महाआघाडी तोडल्याबद्दल नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तर तेजस्वी यादव हे बिहारचे भावी नेते आहेत, असे गौरवोद्गार काढले. अखिलेश यादव, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यांनी व्यासपीठावरुन हात उंचावून एकतेचा संदेश दिला.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव