‘बीजेपी भगाओ’साठी उसळली गर्दी, नितीशकुमार यांना केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 06:52 PM2017-08-27T18:52:08+5:302017-08-28T02:12:04+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला रविवारी मोठी गर्दी उसळली होती.

Lalu's' Remove BJP, Save the country 'rally begins, 16 parties' participation | ‘बीजेपी भगाओ’साठी उसळली गर्दी, नितीशकुमार यांना केले लक्ष्य

‘बीजेपी भगाओ’साठी उसळली गर्दी, नितीशकुमार यांना केले लक्ष्य

Next

पाटणा, दि. 27 : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यात गांधी मैदानावर आयोजित केलेल्या ‘बीजेपी भगाओ, देश बचाओ’ रॅलीला रविवारी मोठी गर्दी उसळली होती. संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आदींनी या रॅलीला हजेरी लावली.

राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपचा पराभव करु आणि त्यासाठी विरोधकांच्या एकीचे दर्शन या रॅलीतून दिसेल. जदयूचे बंडखोर नेते शरद यादव यांचे लालूप्रसाद यादव यांनी व्यासपीठावर गळाभेट घेऊन स्वागत केले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करुन शरद यादव या रॅलीत सहभागी झाले आहेत. त्यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. जदयूचे राज्यसभा सदस्य अली अनवर हेही या रॅलीला उपस्थित होते. जदयूचे नेते के. सी. त्यागी यांनी शरद यादव यांना पाठविलेल्या पत्रात रॅलीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शरद यादव यांनी पक्षाच्या आदेशाचे पालन न केल्यास असे समजण्यात येईल की, त्यांनी स्वत:च्या इच्छेनुसार पक्ष सोडला आहे.

तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचे स्वागत राबडी देवी यांनी केले. व्यासपीठावर भाकपचे महासचिव एस. सुधाकर रेड्डी आणि सचिव डी. राजा यांची उपस्थिती होती. झामुमोचे प्रमुख आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, झाविमोचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी, राष्ट्रवादीचे नेते व संसद सदस्य तारिक अन्वर यांचीही उपस्थिती होती.  या वेळी रघुवंश प्रसाद सिंह, अब्दुल बारी सिद्दीकी, शिवानंद तिवारी यांच्यासह प्रमुख नेत्यांनी महाआघाडी तोडल्याबद्दल नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तर तेजस्वी यादव हे बिहारचे भावी नेते आहेत, असे गौरवोद्गार काढले. अखिलेश यादव, हेमंत सोरेन, तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यांनी व्यासपीठावरुन हात उंचावून एकतेचा संदेश दिला.

शरद यादव यांना अपात्र ठरवा
जदयूचे बंडखोर नेते शरद यादव यांना राज्यसभेसाठी अपात्र ठरवा, अशा मागणीचा अर्ज जदयूच्या वतीने राज्यसभा सभापती वेंकय्या नायडू यांना करण्यात येणार आहे.

Web Title: Lalu's' Remove BJP, Save the country 'rally begins, 16 parties' participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.