लालू प्रसादांनी विलिनीकरणाचा चेंडू टोलवला मुलायमसिंगांच्या कोर्टात

By Admin | Updated: January 15, 2015 22:32 IST2015-01-15T22:32:54+5:302015-01-15T22:32:54+5:30

पाटणा : जनता परिवारातून फुटून बाहेर पडलेल्या घटक पक्षांच्या भविष्यातील विलिनीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आज गुरुवारी राष्ट्रीय जनता दल(राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी या मुद्याचा चेंडू समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांच्या कोर्टात टोलवला़ विलिनीकरणाबाबत कुठलीही घाई नाही़ मुलायमसिंग यादव हा मुद्दा बघतील, असे लालूप्रसाद म्हणाले़

Laloo Prasad cuts toll on Mulayam Singh's court | लालू प्रसादांनी विलिनीकरणाचा चेंडू टोलवला मुलायमसिंगांच्या कोर्टात

लालू प्रसादांनी विलिनीकरणाचा चेंडू टोलवला मुलायमसिंगांच्या कोर्टात

टणा : जनता परिवारातून फुटून बाहेर पडलेल्या घटक पक्षांच्या भविष्यातील विलिनीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच आज गुरुवारी राष्ट्रीय जनता दल(राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी या मुद्याचा चेंडू समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांच्या कोर्टात टोलवला़ विलिनीकरणाबाबत कुठलीही घाई नाही़ मुलायमसिंग यादव हा मुद्दा बघतील, असे लालूप्रसाद म्हणाले़
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या शासकीय निवासस्थानी मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित मेजवानीप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते़
जनता दलातील सहा जुने सहकारी असलेले जनता दल(युनायटेड), राजद, सपा, इंडियन नॅशनल लोकदल, जनता दल(सेक्युलर) आणि समाजवादी जनता पार्टी यांच्या विलिनीकरणाबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले़ यावर लालूप्रसाद म्हणाले की, विलिनीकरणात अडचणी असल्याच्या अफवा भाजपा पसरवित आहे़ आम्ही या मुद्यावरील निर्णयाचे सर्वाधिकार मुलायमसिंग यांना दिले आहेत़ ते शांत बसलेले नाहीत तर यादिशेने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत़
विलिनीकरणाच्या घोषणेसाठी पुढाकार न घेण्याचे कारण विचारले, यासंदर्भात मुलायमसिंग नवी दिल्लीत घोषणा करतील, असे उत्तर त्यांनी दिले़ मुलायमसिंग अधिकृत व्यक्ती आहेत़ मी याबाबत काय बोलणार, असा सवालही त्यांनी केला़
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी जदयू आणि राजदच्या विलिनीकरण होणार, या चर्चेबाबत छेडले असता, याबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसल्याचे ते म्हणाले़

Web Title: Laloo Prasad cuts toll on Mulayam Singh's court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.