लालकृष्ण आडवाणी ठरतील संकटमोचक!
By Admin | Updated: November 9, 2014 01:49 IST2014-11-09T01:49:08+5:302014-11-09T01:49:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपाचे सल्लागार लालकृष्ण आडवाणी यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तारपूर्व झालेल्या भेटीनंतर शिवसेनेतील वाद निकाली निघाल्याचे सूत्रने सांगितले.

लालकृष्ण आडवाणी ठरतील संकटमोचक!
गीतेंच्या यू-टर्नमुळे संदिग्धता : शिवसेनेतील वाद निकाली निघाल्याची सूत्रंची माहिती
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपाचे सल्लागार लालकृष्ण आडवाणी यांच्याशी मंत्रिमंडळ विस्तारपूर्व झालेल्या भेटीनंतर शिवसेनेतील वाद निकाली निघाल्याचे सूत्रने सांगितले.
मात्र त्याचवेळी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर मोदींच्या भेटीसाठी राजधानीत दाखल झालेले केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या ‘यू- टर्न’ मुळे संदिग्धता निर्माण झाली आहे. आडवाणी हे शिवसेनेच्या बाजुचे असल्याने ही घडामोड वेगळी ठरू शकते. आडवाणी गेल्या महिन्यात प्रादेशिक पक्षांना कमजोर समजू नका, असा सल्ला मोदींना दिला होता. त्यानंतर गिते यांचे राजीनामास्त्र गुंडाळले गेले. मात्र सध्याच्या राजकीय पाश्र्वभूमीवर मोदी हा सल्ला किती मनावर घेतात, हा अंदाज ही रात्र देईल.
पंतप्रधांच्या भेटीसाठी आलेले गीते आहेत कुठे यांचा सध्या दिल्लीत शोध सुरू आहे. त्यांच्याबाबतचा घटनाक्रम पाहता काहींच्या मते पंतप्रधानांना भेटून तातडीने मुंबईला रवाना झाले, तर एका सूत्रने संगितले, ते दिल्लीतच अज्ञातस्थळी आहेत. सायंकाळी ते आडवाणी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेले. तिथेच पंतप्रधानांची त्यांची भेट झाली. त्यानंतर पंतप्रधानांच्या सात, रेसकोर्स या निवासस्थानी ते गेले नाहीत. मात्र या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळून शकला नाही. एका सूत्रने सांगितले, की त्यांना पंतप्रधानांनी भेटीची वेळ दिली नाही. गीते व त्यांच्या सहका:यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यांच्या निवासस्थानातील कर्मचा:यांनी ते मुंबईला परतल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील फडणवीस व केंद्राच्या मोदी सरकारमध्ये शिवसेनेच्या सहभागावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी शिवसेनेने अनिल देसाई व सुभाष देसाई या मध्यस्थांना बाजुला करून गीते यांनी शिष्टाईसाठी दिल्लीत पाठविले. गिते दुपारी राजधानीत दाखल झाल्यानंतर तेच चर्चेचे केंद्रबिंदू ठरले. ते पंतप्रधानांच्या भेटीसाठी दोन दिवसांपासून प्रयत्न करत होते. दुपारी तीन वाजतापासून कोणतीही वेळ द्या, मी येतो असे त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला कळविले होते. त्यामुळे रायसिना रोडवरील त्यांच्या निवासस्थानी ते सहका:यासह सज्ज होते. सायंकाळी साडेसहा वाजता ते घरून पंतप्रधांनाकडे जाण्यासाठी निघाले, मात्र उशिरार्पयत पोहोचलेले नव्हते. दुपारी लोकमतशी बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सहभागासाठी एक नाव ठाकरे यांनी सूचविल्याचे सांगून ते गुपित आहे, असे सांगितले. ते अनिल देसाई यांचे असेल का, असे विचारल्यावर त्यांनी मंदस्मित केले. तुम्ही केंद्रातून बाहेर पडत आहात का, याप्रश्नावर ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिलेला नाही़ पण त्यांच्या सूचनेवरून मी आलो आहे. राज्य सरकारमध्ये शिवसेना सहभागी होणार आहे, केंद्रातही आमचा सहभाग आहे. पंतप्रधान मोदी आहेत व त्यांचा मी मंत्री आहे. माङया प्रयत्नांनी युती झाली तर आनंदच होईल, ती विनंती करायला मी आलो आहे.