मोदींवर ‘ललित’सुमने
By Admin | Updated: June 28, 2015 03:16 IST2015-06-28T03:16:46+5:302015-06-28T03:16:46+5:30
भाजपाच्या दिग्गज महिला नेत्यांना गोत्यात आणणारे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी आता भाजपा नेतृत्वासोबत जुळवून घेण्याची खेळी खेळत आहेत.

मोदींवर ‘ललित’सुमने
नवी दिल्ली : भाजपाच्या दिग्गज महिला नेत्यांना गोत्यात आणणारे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी आता भाजपा नेतृत्वासोबत जुळवून घेण्याची खेळी खेळत आहेत. टिष्ट्वटरवर गौप्यस्फोटांचा धडाका लावणाऱ्या ललित मोदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. ललित मोदींनी म्हटले की, मी पंतप्रधानांना सल्ला देण्याची गरज नाही. ते अत्यंत व्यावहारिक आहेत. मोदी मैदानात उतरले तर चेंडू मैदानाबाहेर टोलवतील.