शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lalit Modi: ४ हजार ५५५ कोटी रुपयांची संपत्ती, वादविवाद, अखेर ललित मोदींनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 21:11 IST

Lalit Modi: आयपीएलचे माजी आयुक्त आणि उद्योगपती ललित मोदी हे गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारपणादरम्यान ललित मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आयपीएलचे माजी आयुक्त आणि उद्योगपती ललित मोदी हे गेल्या दोन आठवड्यांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना गेल्या दोन आठवड्यात दोन वेळा कोरोना विषाणूच्या संसर्गासह इन्फ्लूएंझा आणि निमोनिया झाला होता. या आजारपणादरम्यान ललित मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ललित मोदी यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याचं नाव जाहीर केलं आहे.

व्यावसायिक उद्योग समूह के. के. मोदी फॅमिली ट्रस्टमध्ये सुरू असलेल्या संपत्तीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ललिल मोदी यांनी मुलगा रुचिर मोदी याला तातडीने आपला उत्तराधिकारी घोषित केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर लंडनमधील रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या ललित मोदी यांनी सोशल मीडियावर रुचिर मोदी याला कौटुंबिक बाबींमधील आपला उत्तराधिकारी बनवण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय मुलगी आलिया हिच्याशी बोलल्यानंतर घेतला असल्याचे ललित मोदी यांनी सांगितले.

ललित मोदी यांनी सांगितले की, मी याबाबत माझ्या मुलीसोबत चर्चा केली आहे. तसेच एलकेएम कुटुंबातील कामकाजाचे नियंत्रण आणि ट्रस्टमधील आपल्या हितसंबंधांचं नेतृत्व माझा मुलगा रुचिर मोदीकडे सोपवलं पाहिजे, याबाबत आमचं एकमत झालं आहे. ललित मोदींचा त्यांची  आई आणि बहिणीसोबत कौटुंबिक संपत्तीच्या मालकीवरून वाद सुरू आहे. ललित मोदींनी या वादाचा उल्लेख प्रलंबित आणि कठीण असा केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी अनेक टप्प्यातील विचारविनिमय झाला आहे. मात्र  हा वाद संपण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाही आहेत.

आयपीएलचे माजी चेअरमन असलेल्या ललित मोदी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मेक्सिको सिटी येथून लंडन येथे आणण्यात आले आहे. त्यांना कृत्रिम ऑक्सिजन दिला जात आहे. रुचिर मोदी यांना कुटुंबाचा उत्तराधिकारी बनवल्यानंतर आता फॅमिली ट्रस्टच्या कुठल्याही संपत्ती किंवा उत्पन्नामध्ये कुठलीही रुची राहणार नाही. मात्र ते केकेएमएफटीचे विश्वस्त म्हणून कायम राहील, असेहील ललित मोदी यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Lalit Modiललित मोदीbusinessव्यवसायFamilyपरिवार